Pakistan News Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan News: पाकिस्तान बनणार IMFचा चौथा सर्वात मोठा कर्जदार, जाणून घ्या पहिले तीन कर्जदार देश?

Pakistan: पाकिस्तानवर सध्या IMF चे $7.4 बिलियन कर्ज आहे, परंतु $3 बिलियनचे नवीन कर्ज मिळाल्यानंतर IMF चे पाकिस्तानवरील एकूण कर्ज $10.4 बिलियन पर्यंत वाढेल.

Ashutosh Masgaunde

गंभीर आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानला आयएमएफचा पाठिंबा मिळाला आहे. पुढील नऊ महिन्यांत पाकिस्तानला IMF कडून तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळणार आहे.

हे नवीन कर्ज मिळाल्यानंतर पाकिस्तान आयएमएफचा चौथा सर्वात मोठा कर्जदार बनणार आहे. सध्या पाकिस्तान आयएमएफचा पाचवा सर्वात मोठा कर्जदार आहे, परंतु तीन अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मिळाल्यानंतर पाकिस्तान चौथा सर्वात मोठा कर्जदार बनेल.

अर्जेंटिना सर्वात मोठा कर्जदार

पाकिस्तान 1947 मध्ये स्थापन झाल्यापासून सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अर्जेंटिना हा IMF चा सर्वात मोठा कर्जदार देश आहे, ज्यावर IMF चे सुमारे $46 अब्ज कर्ज आहे.

यानंतर दुसऱ्या क्रमांकावर इजिप्तचे नाव आहे, ज्यावर IMFचे 18 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. तिसऱ्या स्थानावर युक्रेन आहे, ज्याचे IMF कडे $12.2 अब्ज देणे आहे. इक्वेडोर सध्या चौथ्या स्थानावर आहे. इक्वाडोरवर IMF चे कर्ज US$8.2 अब्ज आहे.

पाकिस्तानवर आता 10 अब्ज डॉलरचे कर्ज

पाकिस्तानवर सध्या IMF चे $7.4 बिलियन कर्ज आहे, परंतु $3 बिलियनचे नवीन कर्ज मिळाल्यानंतर IMF चे पाकिस्तानवरील एकूण कर्ज $10.4 बिलियन पर्यंत वाढेल.

यासह पाकिस्तान इक्वेडोरला मागे टाकत IMF चा चौथा सर्वात मोठा कर्जदार बनेल. गेल्या वर्षीच्या विनाशकारी पुरामुळे पेमेंट संकटातून जात असलेल्या पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. युक्रेनमधील युद्धाने संपूर्ण जगात महागाई वाढली.

IMF ने जगातील 93 देशांना कर्ज दिले आहे आणि त्यातील टॉप टेन कर्जदारांनी 71 टक्के कर्जे घेतली आहेत. या 10 देशांवर IMF कडून 155 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे.

श्रीलंका, नेपाळ, उझबेकिस्तान, किरगिझस्तान, आर्मेनिया आणि मंगोलिया हे देश देखील IMF चे कर्जदार आहेत परंतु त्यांच्यावर पाकिस्तानपेक्षा खूपच कमी कर्ज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT