Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पेट्रोल पंपाबाहेर लागल्या लांबच लांब रांगा, समोर आलं 'हे' कारण

Pakistan: पुढच्या दोन आठवड्यापर्यंत पेट्रोल -डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल होणार नाही ,तशी सरकारची कोणतीही योजना नसल्याचे सांगत नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan: पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. नागरिकांचे अतोनात हाल होत असल्याच्या अनेक बातम्या जगासमोर आल्या आहेत. दरम्यान ,पेट्रोल आणि डिझेल च्या किमतीत वाढ झाल्याची अफवा पाकिस्तानमध्ये पसरली.

त्यानंतर पेट्रोल पंपाच्या बाहेर नागरिकांनी लांब रांगा लावल्याची माहीत समोर आली आहे. सोशल मिडियावर दाखवल्या जाणाऱ्या बातमीनुसार येणाऱ्या नजीकच्या काळात पेट्रोल डिझेलच्या किंमती 45 ते 80 रुपयापर्यंत वाढतील.

एका पाकिस्तानी नागरिकाच्या म्हणण्यानुसार,आम्ही सोशल मिडियावर आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किंमती वाढणार असल्याचे पाहिले.त्यामुळे डॉलरच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती फेब्रुवारीमध्ये वाढतील.

पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात पेट्रोल आणि डिझेलसाठी लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. पेट्रोलपंपावर मात्र 20 टक्के पेट्रोल शिल्लक असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना याबाबत समजताच त्यांनी नागरिकांना या अफवा निराधार असल्याचे सांगत या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पुढच्या दोन आठवड्यापर्यंत पेट्रोल(Petrol)-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल होणार नाही ,तशी सरकारची कोणतीही योजना नसल्याचे सांगत नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तेलाच्या किंमतीत वाढ करण्यासाठी एक प्रोसेस असते आणि तशी कोणतीही तयारी आम्ही केली नाही.जर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किंमतीत वाढ याचा विचार करता त्याचे तेलाच्या किंमतीवर परिणाम 15 फेब्रुवारीपासून दिसू शकतात.

दरम्यान ,पाकिस्तान( Pakistan)च्या परकीय गंगाजळीत घट झाली असून त्याचा फटका पाकिस्तानला बसत आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानच्या रुपयाची किंमत 250 इतकी झाली आहे. रोजच्या दैनंदीन गरजांसाठी पाकिस्तानला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT