मशिदीतून पाणी घेतल्याने हिंदू कुटुंबाचा छळ  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पुन्हा एकदा हिंदू कुटुंबाचा छळ...

पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या कारणांस्तव अल्पसंख्यक समुदायाला लक्ष्य करण्याच्या घटना नेहमीच सुरु असतात. यातच एका मशिदीतून (Mosque) पाणी घेतल्याने एका गरिब हिंदू (Hindu)शेतकऱ्याच्या कुटुंबाचा छळ करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

इस्लामाबाद: पाकिस्तान मध्ये हिंदू समुदायावरील हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत. नवीन पाकिस्तान निर्माण करण्याची घोषणा केल्या नंतर पंतप्रधान इम्रान खान(PM Imran Khan) यांच्या कार्यकाळात अल्पसंख्यक हिंदू समुदायावर हल्ले वाढले आहे. पंजाब प्रांतात एका मशिदीतून पाणी घेतल्यानंतर एक गरिब हिंदू शेतकरी कुटुंबाचा छळ करण्यात आला. कट्टरतावाद्यांनी धार्मिक (Religious) स्थळाच्या पावित्र उल्लंघन केले असे म्हणत हिंदू कुटुंबाचा छळ केला. यातील आरोपी इम्रान खान यांच्या पक्षाचे असल्याचे सांगितले जात आहे.

पंजाबमधील रहीमयान खान (Rahimyan Khan)शहरात राहणाऱ्या आलम राम भील हे पत्नी व कुटुंबातील इतर सदस्य शेतात काम करत होते. भील यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील सदस्याने पाणी घेण्यासाठी तेथील जवळ असणाऱ्या एका मशिदीत गेले होते. यावेळी काही स्थानिकांनी हल्ला करून मारझोड केली. त्यानंतरही शेतातील काम आटोपून भील कुटुंबीय पुन्हा घरी परतत असताना त्यांना ओलीस ठेवण्यात आले. मशिदीचे पावित्र्य भंग केले या आरोपाखाली त्यांचा छळ करण्यात आला.

पोलिसांकडून(Police) दखल नाही:

भील यांनी यावेळी सांगितले की, पोलिसांना यांनी याबाबतची तक्रार देखील दाखल करून घेतली नाही. मारझोड करणारे हे सत्ताधारी तहरीक-ए-इन्साफ(Tehreek-e-Insaf) पक्षाचे स्थानिक खासदारांशी त्यांचा संबंध आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेचा विरोध म्हणून भील यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. त्यानंतर इम्रान खान यांच्या पक्षाचे आमदार जावेद वारियाच यांनी त्याबाबतची तक्रार दाखल करून घेण्यास मदत केली. असे स्थानिक जिल्हा शांतता समितीचे सदस्य पीटर भील यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT