Bilawal Bhutto Zardari Dainik Gomantak
ग्लोबल

'अफगाणिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करू', बिलावल भुट्टो यांची तालिबानला धमकी

बिलावल भुट्टो यांनीही तालिबानला दोहा कराराची आठवण करून देत, त्याचे पालन करावे अशी आठवण करून दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात रविवारी आत्मघातकी हल्ला झाला. अफगाणिस्तानस्थित दहशतवादी संघटना Daesh ने केलेल्या या हल्ल्यात 54 लोक ठार झाले तर 200 लोक जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानने अफगाणिस्तान विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तान सरकारने दहशतवाद्यांविरोधात सक्त कारवाई न केल्यास, पाकिस्तान अफगाणिस्तानात घुसून दहशतवाद्यांविरोधात कारवाई करेल, असा इशारा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी मंगळवारी दिला.

पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तान सरकार कारवाई करण्यास अपयशी ठरल्यास पाकिस्तानकडे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार काबूलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात स्वसंरक्षणात्मक कारवाई करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. असे बिलावल भुट्टो म्हणाले.

बिलावल भुट्टो यांनीही तालिबानला दोहा कराराची आठवण करून देत, त्याचे पालन करावे अशी आठवण करून दिली. दोहा करारानुसार, दहशतवादी गटांना अफगाणिस्तानमध्ये थारा दिला जाणार नाही असे तालिबानने लेखी आश्वासन दिले होते.

तसेच कोणताही दहशतवादी गट अफगाणिस्तानच्या आतून कोणत्याही देशावर हल्ला करणार नाही. असे या करारानुसार ठरले होते.

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आम्हाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. अफगाणिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास पाकिस्तानला भाग पाडायचे नाही. असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना बिलावल भुट्टो म्हणाले.

अफगाणिस्तानच्या सरकारने या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याची वेळ आली आहे. 'आमच्यावर अशा प्रकारे वारंवार हल्ले होत असतील आणि आम्हाला योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तर आम्हाला अफगाणिस्तानात घुसून दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी लागेल.

रविवारी खैबर पख्तूनख्वाच्या बाजौर जिल्ह्यात जमियत उलेमा-ए-इस्लाम फजल (JUAI-F) च्या रॅलीत स्फोट झाला, ज्यामध्ये सुमारे 400 लोक उपस्थित होते. अफगाणिस्तानस्थित अतिरेकी गट Daesh ने सोमवारी झालेल्या भीषण हल्ल्याची जबाबदारी घेतली. यापूर्वी टीटीपी पाकिस्तानात असे हल्ले करत असे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT