Pakistan People Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानला IMF चा मोठा झटका; बेलआऊट पॅकेज देण्यास नकार

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोक दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करतायेत.

Manish Jadhav

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोक दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करतायेत. मागील काही महिन्यांपासून देशाची आर्थिक अधिकच खलावत चालली आहे. तर दुसरीकडे, पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोक वाढत्या महागाईविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. काही दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाहीये. लोक वाढत्या महागाईने त्रस्त आहेत. तर पाकिस्तान सरकार सातत्याने आंतरराष्ट्रीय संस्थांकडे मदतीची मागणी करतेय.

आर्थिक मंदी आणि राजकीय अस्थिरतेमुळे पाकिस्तानात हालाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोक उपासमारीने मरत आहेत. यातच, महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानला आता नव्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानच्या बुडत्या नावेला जो आधार देत होता त्यानेही मदतीचा हात मागे घेतला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला बेलआऊट पॅकेस देण्यास पुन्हा एकदा नकार दिला आहे.

वास्तविक, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पैशासाठी आपली झोळी आयएमएफसमोर धरली होती. मात्र, आयएमएफने बेलआउट पॅकेजसाठी पाकिस्तानसमोर काही अटी ठेवल्या होत्या, ज्या पाकिस्तानने पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे आर्थिक सुधारणांची चौकशी करण्यासाठी आलेली IMF ची टीम पुन्हा वॉशिंग्टनला परतली. आता पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदतही बंद होण्याची शक्यता आहे.

अटींची पूर्तता न केल्यामुळे बोलणी फसली

मिळालेल्या माहितीनुसार, IMF ची टीम 10 मे रोजी पाकिस्तानात पोहोचली होती. बेलआउट पॅकेजसाठी दोन्ही पक्षांमध्ये बोलणी होणार होती. मात्र, पाकिस्तानने आपल्या अटी पूर्ण न केल्यामुळे बोलणी यशस्वी होऊ शकली नाही. आयएमएफच्या टीमकडून सांगण्यात आले की, पाकिस्तानला आर्थिक मदत मिळण्यासाठी ज्या अटी ठेवण्यात आल्या होत्या त्या पूर्ण झालेल्या नाहीत. अटींच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतरच नवीन बेलआउट पॅकेजवर चर्चा केली जाईल.

काय अट होती?

आयएमएफने पाकिस्तानसमोर ज्या अटी ठेवल्या त्यात महसूल निर्मितीसाठी कर सुधारणा, सामाजिक सुरक्षिततेत सुधारणा, विजेच्या किमती कमी करणे, महागाईवर नियंत्रण आणि सरकारी कामात सुधारणा यांचा समावेश होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जेव्हा पाकिस्तानला पैशाची सर्वात जास्त गरज असताना आयएमएफने मदतीचा हात मागे घेतला. देशात पिठापासून ते स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत सर्वच वस्तूंचा तुटवडा आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तान सरकारच्या विरोधात निदर्शनेही तीव्र होत चालली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT