China corona outbreak
China corona outbreak  Dainik Gomantak
ग्लोबल

China Corona Outbreak: चीनच्या 'या' शहारात कोरोनाचा उद्रेक, 80 हजार पर्यटक अडकले

गोमन्तक डिजिटल टीम

जगाला जीवघेण्या कोरोना संसर्गाची भेट देणाऱ्या चीनच्या एका पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या उद्रेकामुळे जगभरातील जवळपास 80 हजार पर्यटक अडकून पडले आहेत. कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाने कठोर प्रवास निर्बंध लावले आहेत. त्यामुळे "चीनची हवाई" (China's Hawaii) म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिसॉर्ट शहरात अनेक पर्यटक अडकले आहेत.

'सान्या' (Sanya) हे पर्यटन हॉटस्पॉट हेनानच्या दक्षिणेकडील बेटावरील दहा लाखांहून अधिक लोकांचे शहर आहे. आज (रविवारी) शहरात 483 कोरोना रूग्णांची नोंद झाली. प्रशासनाने शहराबाहेर जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली. तसेच, अधिकाऱ्यांनी रेल्वे तिकीट विक्री देखील थांबवली. बाहेर प्रवास करणाऱ्या पर्यटकांना सात दिवसांच्या आतील निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

संसर्गाचा जोर कमी होत नाही तोपर्यंत पर्यटकांना 50 टक्के सवलत देण्यास सांगण्यात आले आहे. चीन हा एकमेव देश आहे जी अजूनही स्नॅप लॉकडाउन आणि क्वारंटाईनसह शून्य-कोविड धोरणाला धरून आहे. यामुळे स्थानिक पर्यटनाला झटका बसत आहे. 2020 च्या सुरुवातीपासून देशाच्या सीमा देखील बंद आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन थांबले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून स्पा, कराओके बार आणि पबसह सर्व मनोरंजन स्थळे बंद आहेत. पण सुपरमार्केट आणि फार्मसी यासारख्या अत्यावश्यक सेवा खुल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT