Drone attack Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: क्रिमियावरील ड्रोन हल्ल्याला रशियाचे चोख प्रत्युत्तर, 20 युक्रेनियन ड्रोन...

Russia: रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, युक्रेनच्या या हल्ल्यात 20 पैकी 14 ड्रोन पाडण्यात आले तर उर्वरित 6 ड्रोन ताब्यात घेण्यात आले आहेत.

Manish Jadhav

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, क्रिमियाला लक्ष्य करणाऱ्या 20 युक्रेनियन ड्रोनचा हल्ला रशियाने हाणून पाडला.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, युक्रेनच्या या हल्ल्यात 20 पैकी 14 ड्रोन पाडण्यात आले तर उर्वरित 6 ड्रोन ताब्यात घेण्यात आले आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

कीवकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नाही

दरम्यान, कीव अधिकाऱ्यांनी या हल्ल्यात युक्रेनचा हात असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. त्याचवेळी, रशियन सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रशियाला क्रिमियाशी जोडणाऱ्या पुलावर धूर दिसत आहे.

मॉस्कोचे गव्हर्नर सर्गेई अक्स्योनोव म्हणाले की, रशियाच्या (Russia) हवाई संरक्षण दलाने युक्रेनची दोन क्षेपणास्त्रे पाडून हा हल्ला परतवून लावला. पुलाचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, हल्ल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

हा हल्ला सलग तिसऱ्या दिवशीही सुरुच होता

याआधी, शुक्रवारी पश्चिम युक्रेनवर रशियाच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हल्ल्यात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी युक्रेनने मॉस्कोवर सलग तिसऱ्या दिवशी ड्रोन हल्ले केले असले तरी कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा रशियन अधिकाऱ्यांनी केला आहे.

युक्रेनच्या (Ukraine) प्रॉसिक्युटर जनरलच्या कार्यालयाने सांगितले की, पश्चिम युक्रेनच्या इव्हानो-फ्रँकिव्हस्क भागात पोलिश सीमेवर क्षेपणास्त्र हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT