Operation Ajay, First flight carrying 212 Indians from Israel lands in Delhi. Dainik Gomantak
ग्लोबल

Operation Ajay: युद्धभूमी ते मायभूमी! इस्रायलमधून 212 भारतीयांना घेऊन पहिले विमान दिल्लीत

Operation Ajay: इस्रायलहून भारतात येण्यापूर्वी एका विद्यार्थ्याने, "मी भारतात जात असल्याने खूप आनंदी सांगितले. इथं सगळंच भयंकर झालंय. आम्ही घरी जाणार आहोत."

Ashutosh Masgaunde

Operation Ajay, First flight carrying 212 Indians from Israel lands in Delhi:

इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी विशेष विमानाने आज नवी दिल्लीत पोहोचली आहे. पहिल्या बॅचमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह एकूण 212 लोक भारतात पोहोचले आहेत.

दिल्लीत पोहोचताच लोकांनी भारत सरकारचे आभार मानले. ते म्हणाले की, आम्ही आता आमच्या देशात आहोत, आम्हाला खूप आनंद होत आहे.

हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी सकाळी इस्रायलवर हल्ला केला, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच आहे. या हल्ल्यात दोन्ही बाजूचे सुमारे 2500 लोक मरण पावले आहेत.

दरम्यान, इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय सुरू केले आहे.

इस्रायलहून भारतात येण्यापूर्वी एका भारतीय विद्यार्थ्याने, "मी भारतात जात असल्याचे सांगितले. मी खूप आनंदी आहे. इथं सगळंच भयंकर झालंय. आम्ही घरी जाणार आहोत."

तेल अवीव विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या हर्षने सांगितले की, "आता त्याला चिंतामुक्त वाटत आहे. सरकारने ऑपरेशन अजय सुरू केल्याचा आम्हाला आनंद आहे, ज्याद्वारे आम्ही आमच्या घरापर्यंत पोहोचू शकू. सरकार मदत करत आहे. येथील परिस्थितीमुळे पालक अधिक चिंतेत होते. मात्र, आता मला घरी पाहून त्यांना खूप आनंद होईल."

तेल अवीवमधील भारतीय दूतावासाचे उप-प्रभारी राजीव बोदवडे आणि व्यावसायिक प्रतिनिधी नवीन रामकृष्ण यांनी इस्रायलमधील भारतीय कंपन्यांशी संपर्क साधून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

कंपन्या, भारतीय आणि विद्यार्थ्यांना देशात परतण्यासाठी उपलब्ध फ्लाइट्सबद्दल ईमेलद्वारे माहिती दिली जात आहे. भारतीयांना आणण्यासाठी हवाई दलाची वाहतूक विमाने स्टँडबायवर ठेवण्यात आली आहेत. आणखी गरज भासल्यास विमान इस्रायलला पाठवले जाईल.

इस्रायलने (Israel) जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीच्या अपवित्र कृत्याचा हा बदला असल्याचे हमासने म्हटले आहे.

हमासने म्हटले आहे की, इस्रायली पोलिसांनी एप्रिल 2023 मध्ये अल-अक्सा मशिदीवर ग्रेनेड फेकून अपवित्र केले होते.

इस्रायलचे सैन्य हमासच्या ठाण्यांवर सातत्याने हल्ले करत आहे आणि अतिक्रमण करत आहे. इस्रायली सैन्य आमच्या महिलांवर हल्ले करत आहे.

हमासचे (Hamas) प्रवक्ते गाझी हमद यांनी अरब देशांना इस्रायलशी असलेले सर्व संबंध तोडण्याचे आवाहन केले आहे. हमाद म्हणाले की, इस्रायल कधीही चांगला शेजारी आणि शांतताप्रिय देश असू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sreejita De: जर्मन नवरा, बंगाली नवरी! प्रसिद्ध अभिनेत्रीने गोव्यात प्रियकरासोबत दुसऱ्यांदा केले लग्न; पाहा Photo

Birsa Munda Jayanti 2024: गोमंतकात ‘धरती अबा’चा पुतळा हवाच, तोही भव्य दिव्य...

Goa Land Policy: राज्यात भू-रुपांतर सुरुच! 32 भूखंडांच्या विभाग बदलास नगररविकास खात्याची मान्यता

Goa Live Updates: परतीच्या पावसाचा पुन्हा तडाखा!

Goa Kartik Purnima: गोव्यात मंदिरांसमोरील दीपमाळची परंपरा कधी पासून?

SCROLL FOR NEXT