NSA बैठकीचे अध्यक्षस्थान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) हे करणार आहेत. Dainik Gomantak
ग्लोबल

NSA ची आज दिल्लीत 8 देशांसोबत 'महाबैठक', अफगाणिस्तानसह अनेक मुद्यांवर होणार चर्चा

या बैठकीचे अध्यक्षस्थान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) हे करणार आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर (Afghanistan) पूर्ण ताबा घेतल्यानंतर तेथून दहशतवाद, कट्टरतावाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यांच्यासारख्या वाढत्या धोक्याबाबत सात चर्चा होणार.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानी (Taliban) राजवट आल्यानंतर निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी 8 देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची दिल्लीत 'महाबैठक' होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) हे करणार आहेत. प्रादेशिक सुरक्षेवरील या NSA बैठकीपूर्वी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अधिकृत सूत्रांनी सांगितले की, डोवाल यांनी उझबेकिस्तानच्या (Uzbekistan) सुरक्षा परिषदेचे सचिव व्हिक्टर मखमुदोव आणि ताजिकिस्तानच्या सुरक्षा परिषदेचे सचिव नसरुल्लो रहमतझोन महमुदजोदा यांच्याशी स्वतंत्र द्विपक्षीय चर्चा केली. ज्यात अफगाणिस्तानातील घडामोडी, अफगाण भूमीवरील दहशतवादाचा संभाव्य धोका आणि युद्धग्रस्त परिस्थिती यावर चर्चा झाली. देशात मानवतावादी संकट हा मुख्य मुद्दा होता.

बैठकीत, डोवाल यांच्यासोबत ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या समकक्षांनी अफगाणिस्तानवर विचार विनिमय केला. अलीकडच्या काळात अफगाणिस्तानमधून दहशतवादी धोक्यांमध्ये तीव्र वाढ झाल्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली. NSA ने अफगाणिस्तानातील परिस्थितीच्या गांभीर्याने भर देण्यात आला. अफगाणिस्तानातील अनेक भाग अन्नटंचाईने ग्रासलेला आहे.

द्विपक्षीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाली

या बैठकीत संरक्षण, सीमा व्यवस्थापन आणि सीमा पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करण्यात आली. उझबेकिस्तानच्या NSA व्हिक्टर मखमुदोव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अफगाणिस्तान हा चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू होता. अफगाणिस्तानचे भविष्य अफगाणिस्तानचे लोक स्वतः ठरवतील. इथे अफगाण राजवटीत पाकिस्तानचा सहभाग थेट निदर्शनास आणून दिला. ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानमधील त्यांच्या समकक्षांनी सांगितले की, अफगाणिस्तानच्या नवीन सरकारने आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविण्यापूर्वी देशामध्ये स्वतःला कायदेशीर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

द्विपक्षीय बैठकीत पाकिस्तानवर साधला निशाणा

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोवाल आणि मखमुदोव यांच्यातील चर्चेदरम्यान, अफगाणिस्तानमधील कोणत्याही अफगाण सरकारची वैधता आंतरराष्ट्रीय मान्यतापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. ते म्हणाले, दोन उच्च अधिकार्‍यांनी पाकिस्तानकडे लक्ष वेधून शेजारील अफगाणिस्तानमध्ये रचनात्मक भूमिका बजावण्यास सहमती दर्शविली आणि युद्धग्रस्त देशात शाश्वत आर्थिक विकासाच्या गरजेवर भर दिला.

सूत्रांनी सांगितले, द्विपक्षीय चर्चेत डोवाल आणि महमुदजोदा यांनी अफगाणिस्तानवर तपशीलवार एकमेकांशी विचार विनिमय केला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मखमुदोव यांचीही भेट घेतली. त्यांनी ट्विट केले, 'उझबेकिस्तानच्या सुरक्षा परिषदेचे सचिव व्हिक्टर मखमुदोव यांचे यजमानपद मिळवून आनंद झाला.

अफगाणिस्तानबाबत विचार विनिमय स्वागतार्ह आहे. आमच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचाही आढावा घेतला.

डोवाल यांनी भूषवीले बैठकीचे अध्यक्षस्थान

अफगाणिस्तानवरील प्रादेशिक सुरक्षा चर्चेत भाग घेण्यासाठी मखमुदोव आणि महमुदजोदा दिल्लीत आहेत. डोवाल बुधवारी होणाऱ्या चर्चेचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तालिबानने तेथे पूर्ण ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानातून दहशतवाद, कट्टरतावाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यांच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी ठोस सहकार्यावर समान विचार निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत या चर्चेचे आयोजन करत आहे.

या मुद्द्यांवर होणार चर्चा

दिल्लीत होणाऱ्या या NSA बैठकीत अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीच्या आगमनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी 'प्रादेशिक सुरक्षा' मजबूत करण्यावर विचार केला जाणार आहे. यात प्रामुख्याने दहशतवाद, अतिरेकी, सीमापार हालचाली, अंमली पदार्थांची तस्करी, अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी मागे सोडलेली शस्त्रे आणि उपकरणे यांचा संभाव्य वापर या मुद्द्यांचा समावेश असेल.

या देशांचे सुरक्षा अधिकारी बुधवारी संयुक्तपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याची शक्यता आहे. भेट देणारे काही प्रतिनिधी अमृतसर आणि आग्रा येथे पर्यटनासाठी जातील.

हे 8 देश या बैठकीत होणार सहभागी

भारत, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान व्यतिरिक्त रशिया, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तानचे उच्च सुरक्षा अधिकारी अफगाणिस्तानवरील दिल्ली प्रादेशिक सुरक्षा संवादात सहभागी होत आहेत. डोवाल बुधवारी रशिया आणि इराणच्या NSA सह द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. चीनलाही या संवादात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते, परंतु त्यांनी आधीच ठरलेल्या कार्यक्रमांचा हवाला देत सहभागी होण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. पाकिस्तानही या चर्चेत सहभागी होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT