Israel Benjamin Netanyahu  Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: ''जिथे संधी मिळेल तिथे बदला घेऊ''; लेबनॉन आणि इराणमधील भीषण हल्ल्यांदरम्यान इस्रायलची धमकी

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं घनघोर युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं घनघोर युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, हे युद्ध आता इतर देशांमध्ये पसरत आहे. या आठवड्यात, इस्रायलने लेबनॉनमध्ये ड्रोन हल्ल्यात हमासचा डेप्यूटी कमांडर सालेह अल-अरौरी याला ठार केले. इतकेच नाही तर बुधवारी इराणमधील माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ दोन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात 103 जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे 200 लोक जखमी झाले. दरम्यान, यामध्ये इस्रायलचीही भूमिका होती, असे मानले जात आहे. दरम्यान, इस्त्रायलच्या गुप्तचर प्रमुखाचे म्हणणे आहे की, आम्हाला जिथे संधी मिळेल तिथे आम्ही बदला घेऊ.

दरम्यान, आत्तापर्यंत इस्रायलने या हल्ल्यांबाबत काहीही सांगितलेले नाही किंवा जबाबदारीही स्वीकारलेली नाही, पण मोसाद प्रमुख डेव्हिड बर्निया यांचे वक्तव्य हेच सूचित करते. डेव्हिड बर्निया म्हणाले की, 'मोसाद 7 ऑक्टोबरचा हल्ला करणाऱ्या मारेकऱ्यांशी सामना करण्यासाठी उत्सुक आहे.'

दुसरीकडे, डेव्हिड बर्निया यांनी बुधवारी माजी मोसाद प्रमुख झवी जमीर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी या गोष्टी सांगितल्या. झवी जमीर यांच्या नेतृत्वाखाली इस्रायलने 1972 मध्ये पॅलेस्टाईनच्या अतिरेकी गटांवर हल्ला केला होता. अरौरी याच्या हत्येच्या एका दिवसानंतर त्यांचे हे वक्तव्य आले आहे. अरौरीच्या हत्येमुळे लेबनॉनमध्ये सक्रिय असलेली दहशतवादी संघटना हिजबुल्लाही हादरली आहे. हिजबुल्लाने बदला घेण्याबाबत वक्तव्य केले आहे. एवढेच नाही तर इस्रायलचा हा हल्ला लेबनॉनच्या सार्वभौमत्वावरही हल्ला असल्याचे हिजबुल्लाने म्हटले आहे. हिजबुल्लाच्या या धमकीनंतर इस्रायलमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच, आमचा हल्ला लेबनॉनवर नसून आमच्या लोकांना मारणाऱ्यांवर होता, असे वक्तव्य इस्रायलनेही केले आहे. या हल्ल्यात अरौरीशिवाय हमासचे आणखी 6 दहशतवादी मारले गेले. डेव्हिड बर्निया म्हणाले की, ''प्रत्येक अरबाने हे समजून घेतले पाहिजे की, 26 ऑक्टोबरच्या हल्ल्यात आपल्या मुलाने भूमिका बजावली असती तर त्याला त्याच्या मांडीवर डोके धरुन रडावे लागले असते. इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुमारे तीन महिन्यांपासून युद्ध सुरु आहे.'' इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे 20 हजार लोक मारले गेले आहेत. याशिवाय, गाझातील महत्त्वाची ठिकाणेही जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT