Nostradamus Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga यांच्या आधी नॉस्ट्राडेमस यांनी 500 वर्षांपूर्वी केली होती 'ही' भविष्यवाणी

Nostradamus Predictions: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांची अनेक भाकीते आत्तापर्यंत खरी ठरली आहेत.

दैनिक गोमन्तक

Nostradamus Predictions: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांची अनेक भाकीते आत्तापर्यंत खरी ठरली आहेत. त्यांच्या भाकितांसंबंधी अनेकदा चर्चाही होते. बाबा वेंगा यांनी 111 वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती, ज्याबद्दल जगभरात भीतीचे वातावरण आहे. बाबा वेंगा यांनी 2022 वर्षासाठी अनेक भाकिते केली होती, त्यापैकी 2 आत्तापर्यंत खरी ठरली आहेत, त्यानंतर आता 2023 च्या भाकितांवर चर्चा होत आहे. यातच आता नॉस्ट्रॅडॅमस यांनी केलेल्या भाकितांबद्दल जोरदार चर्चा होऊ लागली आहे. नॉस्ट्रॅडॅमस यांनी 2022 मध्ये चलनवाढीचा अंदाज व्यक्त वर्तवला होता. महागाई नियंत्रणाबाहेर जाईल असेही त्यांनी भाकित वर्तवले आहे. याचच परिणाम म्हणून अनेक देशांमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. नॉस्ट्रॅडॅमस यांनी अमेरिकन डॉलरमध्ये मोठी घसरण होण्याचा अंदाजही वर्तवला आहे.

दरम्यान, नॉस्ट्राडेमस यांच्या भविष्यवाणीनुसार, 2022 हे वर्ष प्रचंड विनाशानंतर शांतता आणेल. मात्र, या शांततेपूर्वी संपूर्ण जगात 72 तास अंधार निर्माण होईल. प्रचंड बर्फवृष्ठीनंतर अनेक देशांवर युद्धाचे ढग जमू लागतील. नॉस्ट्रॅडॅमस यांनी 2022 मध्ये समुद्रात लघुग्रह पडण्याची भविष्यवाणी केली होती, ज्यामुळे तीव्र लाटा निर्माण होतील. पृथ्वीवर मोठा विनाश होऊ शकतो. त्यामुळे अनेक देश पाण्याखाली जातील, अशी शक्यताही नॉस्ट्राडेमस यांनी वर्तवली आहे.

दुसरीकडे, नॉस्ट्रॅडॅमस (Nostradamus) यांनी 2022 मध्ये पूर, चक्रीवादळ आणि इतर अनेक नैसर्गिक आपत्तींबद्दल भाकीते वर्तवली आहेत, ज्यामुळे प्रचंड विनाश होऊ शकतो. सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) पुरामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. पुरामुळे पाकिस्तानात एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नॉस्ट्रॅडॅमस यांनी सुमारे 500 वर्षांपूर्वी 2022 मध्ये एक विनाशकारी आण्विक स्फोट होण्याची भविष्यवाणी केली होती, ज्यामुळे हवामान बदल आणि पृथ्वीचे हवामान बदलू शकते. याशिवाय स्फोटामुळे अनेक बदल दिसून येतील.

तसेच, हिटलरची राजवट, दुसरे महायुद्ध, 9/11 चा दहशतवादी (Terrorist) हल्ला आणि फ्रेंच राज्यक्रांती याविषयी नॉस्ट्रॅडॅमस यांनी भाकीत (Nostradamus Predictions) केले होते, जी खरे ठरले आहेत. नॉस्ट्राडेमस यांचा जन्म 14 डिसेंबर 1503 रोजी जर्मनीमध्ये झाला होता. तर 2 जुलै 1566 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT