North Korea Missile Test Dainik Gomantak
ग्लोबल

North Korea Missile Test: एकाच महिन्यात सातव्यांदा क्षेपणास्त्राची चाचणी शांततेचा भंग!

दक्षिण कोरियाच्या लष्कराचा याला दुजोरा असल्यामुळे, उत्तर कोरियाने एकाच महिन्यात सातव्यांदा शस्त्रास्त्रांची चाचणी करून आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणली आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या करून जगाला चकित करत आहे, पण आता पुन्हा एकदा अज्ञात शस्त्र प्रक्षेपित करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या (South Korea) लष्कराने याला दुजोरा देखील दिला आहे. उत्तर कोरियाने एकाच महिन्यात सातव्यांदा शस्त्रास्त्रांची चाचणी (North Korea Missile Test) करून आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणली आहे. याआधी उत्तर कोरियाने एका महिन्यात इतक्या शस्त्रास्त्रांची शेवटची चाचणी 2019 मध्ये केली होती. त्यावेळी हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यामधील हाय-प्रोफाइल चर्चा अयशस्वी ठरली होती. तेव्हापासून कोरियाची अमेरिकेशी चर्चा पुर्णपणे ठप्प झाली आहे.

दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफने एका निवेदनात असे म्हटले आहे की, उत्तर कोरियाने पूर्व समुद्राच्या दिशेने अज्ञात क्षेपणास्त्र सोडली आहे. उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडल्याचेही जपानच्या तटरक्षक दलाने म्हटले आहे. देशाची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही उत्तर कोरिया सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या करत आहे. उत्तर कोरियाने गेल्या आठवड्यात अमेरिकेने घेतलेल्या आण्विक स्फोटकांची आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी पुन्हा सुरू करण्याची धमकी दिली होती.

तत्पूर्वी, हुकूमशहा किम जोंग उन यांनी देखील देशातील युद्ध सामग्रीशी संबंधित कारखान्यांना भेट दिली होती आणि उत्तर कोरियाच्या नवीनतम शस्त्रास्त्रांच्या चाचण्यांची पुष्टी केली. या महिन्यातच उत्तर कोरियाने दोन हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली जात आहे.

याआधी गुरुवारी उत्तर कोरियाने दोन संशयित बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे समुद्रात सोडली. अशी दक्षिण कोरियाच्या लष्कराने ही माहिती दिली. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की उत्तर कोरियाच्या चाचणी क्रियाकलापांमध्ये असामान्य वाढ म्हणजे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील निर्बंध कमी करण्याच्या उद्देशाने दीर्घकाळ रखडलेल्या चर्चेसाठी बिडेन प्रशासनावर दबाव आणणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT