Pacific Ocean Daink Gomantak
ग्लोबल

Pacific Ocean: प्रशांत महासागराच्या तापमानात होणार मोठा बदल; 'एल निनो'चा प्रभाव कमी होण्याची शक्यता

Pacific Ocean cooling January 2027: ‘सीपीसी’ने नुकतीच ‘एल निनो’ची सद्यःस्थिती आणि आगामी नऊ महिन्यांचा अंदाज जाहीर केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मयुरेश प्रभुणे

पुणे: अमेरिकी हवामानशास्त्र संस्था ‘नोआ’च्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) नुकत्याच वर्तविलेल्या अंदाजानुसार जानेवारी २०२७ पासून विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान कमी होण्याची शक्यता असून, पुढील वर्षीच्या मॉन्सूनच्या आगमनापर्यंत प्रशांत महासागरात ‘न्यूट्रल’ स्थिती निर्माण होऊ शकते.

‘सीपीसी’ने नुकतीच ‘एल निनो’ची सद्यःस्थिती आणि आगामी नऊ महिन्यांचा अंदाज जाहीर केला. या अहवालानुसार, विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या बहुतांश क्षेत्राचे तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले जात आहे. महासागराच्या पूर्व भागात हे तापमान सरासरीपेक्षा २.९ अंशांनी जास्त आहे. महासागराच्या पृष्ठभागाखालील उबदार प्रवाहांचे तापमान सरासरीपेक्षा १० अंशांनी जास्त नोंदले जात आहे. येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत विक्रमी तीव्रतेचा (सरासरीपेक्षा २.५ अंशांपेक्षा जास्त तापमान) ‘एल निनो’ विकसित होण्याची शक्यता ६९ टक्के आहे.

‘एल निनो’ नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च पातळीवर पोचल्यानंतर जानेवारीपासून त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा एक अंशांच्या दरम्यान येण्याची शक्यता असून, त्यावेळी क्षीण ‘एल निनो’ राहण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

प्रशांत महासागराच्या तापमानाच्या अंदाजाचा दर लक्षात घेता, पुढील वर्षीच्या जूनपर्यंत तेथील तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंशांच्या दरम्यान येण्याची शक्यता जास्त आहे. हा अंदाज खरा ठरल्यास, पुढील मॉन्सूनच्या आगमनाच्या वेळी प्रशांत महासागरातील सध्याची ‘एल निनो’ची स्थिती जाऊन तिथे न्यूट्रल स्थिती तयार होऊ शकते. तेथील न्यूट्रल स्थिती मॉन्सूनवर प्रतिकूल परिणाम न करता तटस्थ राहू शकते, असे ऐतिहासिक आकडेवारी सांगते.

११ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) आकडेवारीनुसार, देशभरात एक जून ते १४ ऑगस्ट या कालावधीत सरासरीपेक्षा १२.६ टक्के कमी, तर राज्यात तीन टक्के कमी पाऊस झाला आहे. ऑगस्टमध्ये कोकण आणि घाटमाथा वगळता राज्यात इतरत्र पावसाचा जोर ओसरल्यामुळे अपुऱ्या पावसाच्या जिल्ह्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. जुलैअखेरीस राज्यात फक्त पाच जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस (सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के कमी) नोंदला गेला होता. १४ ऑगस्टपर्यंत सिंधुदुर्ग, नंदुरबार, सोलापूर, जालना, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली हे ११ जिल्हे अपुऱ्या पावसाच्या श्रेणीमध्ये आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT