Nirav Modi
Nirav Modi  
ग्लोबल

Nirav Modi: 13,500 कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात फरार नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

गोमन्तक डिजिटल टीम

अनेक दिवसांपासून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला (Nirav Modi) भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) घोटाळा प्रकरणी नीरव मोदी भारतातून फरार झाला होता. लंडन कोर्टात (London Court) भारताकडून मांडण्यात आलेल्या मागणीला अखेर यश आले असून, कोर्टाने नीरव मोदीची याचिका फेटाळून लावली आहे.

हिरे व्यापारी 13,500 कोटींच्या आर्थिक घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीची भारतीय तपास यंत्रणांकडून चौकशी होणार आहे. नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यात यावं, यासाठी भारताकडून सातत्याने मागणी होत होती. याविरोधात नीरव मोदीनं लंडन उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र, आज या याचिकेच्या सुनावणीदरम्यान लंडन कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे.

भारतात नीरव मोदीवर 13 हजार 500 कोटींचा पंजाब नॅशनल बँक घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच, पुरावे गायब करणे आणि साक्षीदारांवर दबाव टाकणे, मृत्यूसाठी कारणीभूत ठरणे असे गुन्हेदेखील सीबीआयनं नीरव मोदीवर दाखल केले आहेत. दरम्यान, फेब्रुवारीतच नीरवला भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टानं दिला होता. तेव्हापासून नीरव मोदी वँड्सवर्थ तुरुंगात होता. मात्र, त्याने या निर्णयाला आव्हान देणारी याचिका लंडन कोर्टात केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT