New Zealand MP Golriz Ghahraman Dainik Gomantak
ग्लोबल

महिला खासदाराला महागडे कपडे चोरण्याचा शौक, प्रकरण उघडकीस आल्यानंतर द्यावा लागला पदाचा राजीनामा!

Manish Jadhav

New Zealand MP Golriz Ghahraman: राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून सर्वसामान्यांना चांगल्या कामाची अपेक्षा असते. परंतु, माननीय खासदारच चोरी करत असतील तर, होय हे खरं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार न्यूझीलंडमधून समोर आला आहे. येथील महिला खासदारावर दुकानातून महागडे कपडे एकदा नव्हे तर तीनदा चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संबंधीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला खासदाराला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, न्यूझीलंडच्या ग्रीन पार्टीच्या महिला खासदार गोलरिज घरमन यांच्यावर महागडे कपडे चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऑकलंड आणि वेलिंग्टन येथील दोन वेगवेगळ्या दुकानांतून एकदा नव्हे तर तीनदा महागडे कपडे चोरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, यूएन मानवाधिकार वकील गोलरिज यांनी 2017 मध्ये त्यांच्या पक्षाच्या न्याय विभागाची जबाबदारीही सांभाळली होती. या प्रकरणी गोलरिज म्हणाल्या की, ''मी बर्‍याच लोकांना निराश केले आहे आणि मला खूप वाईट वाटत आहे."

इराणमधून पळून न्यूझीलंडला पोहोचल्या होत्या

गोलरिज घरमन लहानपणीच त्यांच्या कुटुंबासह इराणमधून पळून गेल्या होत्या. यानंतर त्यांना न्यूझीलंडमध्ये राजकीय आश्रय देण्यात आला. चोरीच्या आरोपानंतर मंगळवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एक व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. व्हिडिओमध्ये त्या ऑकलंडच्या बुटीकमधून डिझायनर हँडबॅग चोरताना दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT