Nepal Floods Dainik Gomantak
ग्लोबल

Nepal Floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 288 भारतीय बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; मदतीसाठी कंट्रोल रुम-हेल्पलाइन सुरु

288 Indians Uncontactable Nepal Floods MEA: नेपाळ आणि तिबेटच्या सीमाभागातील विनाशकारी ढगफुटी आणि भीषण महापुरामुळे अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Manish Jadhav

288 Indians Uncontactable Nepal Floods MEA: नेपाळ आणि तिबेटच्या सीमाभागातील विनाशकारी ढगफुटी आणि भीषण महापुरामुळे अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 288 भारतीय नागरिक बेपत्ता असून त्यांचा अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही, अशी धक्कादायक माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली. या घटनेमुळे भारत सरकार सतर्क झाले असून बेपत्ता नागरिकांशी संपर्क साधण्याचे आणि त्यांच्या शोधासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने प्रयत्न सुरु आहेत. आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कंट्रोल रुम स्थापन करुन हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संपर्क तुटलेल्या 288 भारतीय नागरिकांमध्ये विविध राज्यांतील लोकांचा समावेश आहे. यामध्ये त्रिशूली-1 या जलविद्युत प्रकल्पात काम करणाऱ्या 73 भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश असून भारतीय दूतावास या प्रकल्पाच्या प्रमुखांच्या सतत संपर्कात आहे. याशिवाय, तामिळनाडूमधून प्रवास करणाऱ्या 37 आणि 49 पर्यटकांच्या दोन वेगवेगळ्या गटांशी संपर्क होऊ शकलेला नाही.

तसेच, पश्चिम बंगालमधील 32 जणांचा एक समूह रसुवा जिल्ह्यातील तिमुरे भागात अडकला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याव्यतिरिक्त, केरळमधील 33 नागरिक आणि रिचा टूरद्वारे प्रवास करणारे इतर वेगवेगळ्या राज्यांतील 61 भारतीय नागरिक देखील बेपत्ता आहेत.

आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचण्यासाठी काठमांडूमधील भारतीय दूतावास शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, महापुरामुळे वीज आणि टेलिफोन लाईन खंडित झाल्याने संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून बचाव कार्यात मोठे अडथळे येत आहेत. दुसरीकडे, तिबेटच्या बाजूला असलेल्या प्रभावित भागातही परिस्थिती बिकट आहे. तिथे सुमारे 150 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे, तर सुरक्षित असलेल्या आणखी 200 भारतीय नागरिकांनी भारतात परतण्यासाठी तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.

सध्या मदत मागणाऱ्यांपैकी 95 भारतीय धारचेन येथे असून ते नेपाळ सीमेवरील हिल्सा भागाच्या दिशेने प्रवास करत आहेत. तसेच काही नागरिक जिलॉन्ग शहर आणि झुथुलफुक भागात अडकले आहेत. परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास आणि चीन व नेपाळचे स्थानिक प्रशासन यांच्यात सातत्याने समन्वय साधला जात असून, सर्व भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RGP Goa: काँग्रेससोबत आघाडीसाठी 'आरजी'ची तयारी! अमोल नावेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती; 30 दिवसांत चर्चा पूर्ण करण्याची मागणी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या जागतिक क्रमवारीला मोठा धक्का! 3 महिन्यांत 12 स्थानांची घसरण; प्रवासी समाधानाचा गुणांकही 4.94 वरून 4.89 वर

FDA Raid: पर्वरीतील 3 सरकारी कँटीनवर 'एफडीए'ची कारवाई! अस्वच्छता आणि बांधकामातील गंभीर त्रुटी आढळल्याने तिन्ही कँटीन तातडीने बंद

8th Pay Commission: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! 15 वर्षांची कम्युटेड पेन्शनची मुदत कमी होणार? 8व्या वेतन आयोगाकडे मोठी मागणी

Colvale jail: 'कारागृह', सुधारगृह की पंचतारांकित हाॅटेल? भिंतीआड सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कठोर कारवाईची गरज

SCROLL FOR NEXT