Seti hydroelectric power plant site Dainik Gomantak
ग्लोबल

नेपाळची सेती जलविद्युत प्रकल्पासाठी भारताशी चर्चा सुरू

वृत्तानुसार, नेपाळने याच प्रकल्पासाठी 2012 आणि 2017 मध्ये चिनी कंपन्यांसोबत करार केले होते.

दैनिक गोमन्तक

नेपाळने आपल्या महत्त्वाच्या पश्चिम सेती जलविद्यूत प्रकल्पासाठी भारताशी चर्चा सुरू केली आहे. याआधी नेपाळी सरकार या प्रकल्पाबाबत चीनशी चर्चा सुरू होती, मात्र आता नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी सेती जलविद्युत प्रकल्पाबाबत भारताशी चर्चा करत असल्याची माहिती दिली आहे. या प्रकल्पांतर्गत 1250 मेगावॅट वीजनिर्मिती करता येणार आहे. (Nepal in talks with India over Seti hydroelectric power plant project)

वृत्तानुसार, नेपाळने याच प्रकल्पासाठी 2012 आणि 2017 मध्ये चिनी कंपन्यांसोबत करार केले होते. आता नेपाळचे पीएम देउबा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 मे रोजी लुंबिनीला येत आहेत. दरम्यान, या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी त्यांच्याशी निर्णायक चर्चा होणार आहे.

सेती प्रकल्पाचे 1981 पासून काम सुरू
वृत्तानुसार, पश्चिम सेती जलविद्युत प्रकल्पाचे काम 1981 पासून सुरू आहे. 1987 मध्ये एका फ्रेंच कंपनीने प्रकल्पात बदल केला. पुढे 1994 मध्ये एका ऑस्ट्रेलियन कंपनीला प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्याचा परवाना मिळाला. या प्रकल्पांतर्गत 90 टक्के वीज भारताला विकायची होती. मात्र, नंतर या प्रकल्पात चिनी कंपन्या सहभागी झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT