Nepal Accident ai generated images
ग्लोबल

Nepal Electric Van Accident: नेपाळमध्ये भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली इलेक्ट्रिक व्हॅन 500 मीटर खोल दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू; 5 गंभीर जखमी

Nepal Electric Van Accident: नेपाळमध्ये गुरुवारी (12 नोव्हेंबर) सकाळी भीषण अपघात घडला. प्रवाशांनी भरलेली एक इलेक्ट्रिक व्हॅन अनियंत्रित होऊन तब्बल 500 मीटर खोल दरीत कोसळली.

Manish Jadhav

Nepal Electric Van Accident: नेपाळमध्ये गुरुवारी (12 नोव्हेंबर) सकाळी भीषण अपघात घडला. प्रवाशांनी भरलेली एक इलेक्ट्रिक व्हॅन अनियंत्रित होऊन तब्बल 500 मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात तीन मुलांसह एकूण 10 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले. स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले असून, सर्व जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात (Accident) गुरुवारी सकाळी 5 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास नेपाळच्या बागमती प्रांतातील मकवानपुर जिल्ह्यातील भीमफेदी गाउंपालिका-6 अंतर्गत येणाऱ्या चिसापानी गढीजवळ घडला. ही इलेक्ट्रिक व्हॅन राजधानी काठमांडू येथून सर्लाहीच्या दिशेने जात होती आणि या प्रवासात व्हॅनमध्ये सुमारे 15 प्रवासी होते. भीमफेदी-कुलेखानी-काठमांडू या खडकाळ व धोकादायक रस्त्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. वाहन रस्ता सोडून थेट 500 मीटर खाली खोल दरीत कोसळल्याने वाहनाचा चक्काचूर झाला.

स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये तीन महिला, दोन लहान मुली आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. सशस्त्र दलाचे सहप्रवक्ता शैलेन्द्र थापा यांनी या अपघाताला दुजोरा दिला असून मृतांचा आकडा 10 असल्याचे स्पष्ट केले. दुर्घटना घडताच स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलांनी तातडीने मदतकार्य सुरु केले. सात सदस्यांचे विशेष बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले, ज्यांनी दरीत कोसळलेल्या वाहनातून मृतदेह बाहेर काढले आणि जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले. या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, डोंगराळ भागातील प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. प्रशासनाकडून या संपूर्ण अपघाताची कसून चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: देव तारी त्याला कोण मारी! हत्तीने दुचाकीस्वाराच्या छातीवर दोनदा ठेवला पाय, तरीही चमत्कारिकरीत्या वाचला तरुण; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

गोव्यासाठी प्रत्येकवेळी नवे टी-20 नेतृत्व; यंदा रणजी संघाबरोबर झटपट क्रिकेटसाठीही अभिनववर विश्वास

NSG Commandos New Uniform: एनएसजी कमांडोंसाठी आता 'ब्रीदेबल' गणवेश, वाढत्या उष्णतेतही हवा खेळती राहणार

Cigarette Price Hike: सिगारेटच्या शौकिनांना मोठा झटका! एका पाकिटामागे 10 रुपयांची वाढ; आता मोजावे लागणार 'इतके' रुपये

राजकीय आरक्षण; अनुसूचित जमातींच्या भावनांशी खेळ नको!

SCROLL FOR NEXT