India allowed to operate two flights daily to evacuate citizens from Kabul Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानातील भारतीयांना AIRLIFT करण्यासाठी रोज 2 विमांनाना NATO ची परवानगी

Afghanistan: 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कारवाया नियंत्रित करणाऱ्या नाटोने ही परवानगी दिली असल्याचे समजते आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांना भारतात घेऊन येण्यासाठी भारताला दररोज दोन विमानांचे उड्डाण करण्याची परवानगी नोटोने भारताला दिले असल्याची माहिती आज सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिली आहे. (India allowed to operate two flights daily to evacuate citizens from Kabul)

15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कारवाया नियंत्रित करणाऱ्या अमेरिकन आणि उत्तर अटलांटिक करार संघटनेने (NATO) भारताला ही परवानगी दिली आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी सुमारे 150 भारतीयांना तालिबानने काबूल विमानतळाच्या गेटबाहेर पकडले आणि त्यांना ट्रकने दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. मोठ्या चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. अफगाणिस्तानातून 85 भारतीयांना हवाई दलाच्या विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले असुन उर्वरित भारतीयांनाही मायदेशी आणण्याची तयारी सुरू आहे.

तालिबानने पकडलेल्या सुमारे 150 भारतीयांचे अपहरण झाल्याचे वृत्त आज सकाळी आले होते, त्यानंतर या नागरिकांना सोडण्यात आले असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. आता ते सर्व नागरिकांना काबूल विमानतळावरु भारतात आणले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT