Myanmar  Dainik Gomantak
ग्लोबल

यूनियन डे निमित्त म्यानमार सरकारची मोठी घोषणा, 800 कैद्यांची करणार सुटका !

म्यानमारने शनिवारी 814 कैदी आणि 7 परदेशी कैद्यांना माफी देण्याची घोषणा केली आहे. यूनियन डे च्या हीरक महोत्सवानिमित्त म्यानमार सरकारने (Myanmar Government) ही घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

म्यानमारने शनिवारी 814 कैदी आणि 7 परदेशी कैद्यांना माफी देण्याची घोषणा केली आहे. यूनियन डे च्या हीरक महोत्सवानिमित्त म्यानमार सरकारने (Myanmar Government) ही घोषणा केली आहे. गेल्या वर्षीही 23 हजार कैद्यांची सुटका करण्यात आली होती. (Myanmar Government Announces The Release Of 800 Prisoners On Union Day)

जुंटा प्रमुख मिन आंग हलाईंग (Min Aung Hlaing) यांनी अरकान सैन्याच्या 46 सदस्यांविरुद्ध आणि त्यांच्याशी संबंधित इतरांविरुद्धचा खटलाही बंद केला असल्याची माहिती शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे. मात्र, या लोकांवर न्यायालयात (Court) खटले सुरु होते. तुरुंगात असलेल्या नांग खिन हटवे मिंटचे माजी काईन मुख्यमंत्री यांचीही शिक्षा कमी करण्यात आली आहे.

जुंटाचे प्रवक्ते जाओ मिन तुन यांनी एएफपीला सांगितले की, 'ज्यांना माफी देण्यात आली आहे, ते बहुतेक यांगूनच्या तुरुंगातील आहेत. देशाच्या सन्मानार्थ कैद्यांची सुटका झाली आहे.' तथापि, सोडलेल्यांमध्ये ऑस्ट्रेलियन नागरिक शॉन टर्नेल (Sean Turnell) होते की नाही हे त्यांनी सांगितलेले नाही. ऑस्ट्रेलियन अर्थशास्त्राचे प्राध्यापक टर्नेल नेत्या आंग सान स्यू की यांचे सल्लागार म्हणून काम करत होते. लष्करी बंडानंतर काही दिवसांनीच त्यांना अटक करण्यात आली होती. म्यानमारच्या अधिकृत गुप्त कायद्याचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दोषी आढळल्यास, टर्नेलला 14 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

एका अहवालानुसार, फेब्रुवारी 2021 मध्ये सत्तापालट झाल्यानंतर 31 जानेवारी रोजी आणीबाणीची स्थिती आणखी सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली होती. लष्करी बंडानंतर, म्यानमारच्या सुरक्षा दलांनी निदर्शने करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी कारवाई केली होती. ज्यामध्ये 1,000 हून अधिक नागरिक मारले गेले आणि हजारो लोकांना अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT