Monkeypox Virus Dainik Gomantak
ग्लोबल

ब्रिटेनमध्ये आता मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव; 20 रुग्णांची नोंद

एका इंग्लंड शहरात मंकीपॉक्सचे 11 रुग्ण

दैनिक गोमन्तक

सुमारे दोन ते तीन वर्षे कोरोनाने संपूर्ण जग हैराण झाले होते. मात्र गेल्या काही महिन्यात मानवी जीवन पूर्वपदावर येत आहे. जगातील बहूतांशी देशात कोरोना संक्रमण थांबले आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावानंतर आता आणखी एका आजारानं जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनामधून सावरतो न सावरतो, तोच ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सनं धुमाकूळ घातला आहे. ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात एकूण 20 रुग्णांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. फक्त एका इंग्लंड शहरात मंकीपॉक्सचे 11 रुग्ण आढळले आहेत. (Monkeypox outbreak in UK now; Record of 20 patients )

ब्रिटन सरकारनं शुक्रवारी यासंदर्भात माहिती देताना, मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर ठरणारी लस मिळवण्यासाठी सरकारकडून जोमाने प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मंकीपॉक्स हा देवी रोगासारखाच आजार आहे.

मंकीपॉक्सचे परिणाम कमी करणाऱ्या लसींची खरेदी

जी-7 देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान, ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी शुक्रवारी बोलताना सांगितलं की, मंकीपॉक्सची लागण झालेल्या बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. आम्ही मंकीपॉक्सवर प्रभावी असणाऱ्या लसींची खरेदी केली आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो.

त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहनही ब्रिटन सरकारकडून नागरिकांना केलं जात आहे. तसेच, मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तींचे कपडेही न वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. UKHSA चे मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी सांगितलं की, आम्ही मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींना ट्रेस करत आहोत. तसेच, त्यांना यासंदर्भात योग्य ती माहिती देऊन काळजी घेण्याचं आवाहन करत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

SCROLL FOR NEXT