Microsoft News Updates Dainik Gomantak
ग्लोबल

Microsoft ने Apple ची संपवली बादशाहत, बनली जगातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी

Microsoft: आयफोन बनवणाऱ्या अॅपलला मागे टाकत मायक्रोसॉफ्ट जगातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी बनली आहे.

Manish Jadhav

Microsoft: आयफोन बनवणाऱ्या अॅपलला मागे टाकत मायक्रोसॉफ्ट जगातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी बनली आहे. आयफोनच्या ग्रोथबाबत वाढत्या चिंतेमुळे अॅपलच्या शेअर्समध्ये अलीकडच्या काळात घसरण झाली. 2021 नंतर पहिल्यांदाच मायक्रोसॉफ्टचे वॅल्यूएशन अॅपलपेक्षा जास्त झाले आहे.

मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये तेजी

दरम्यान, AI च्या वाढत्या ट्रेंडने अलीकडच्या काळात मायक्रोसॉफ्टच्या स्टॉकने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. आजच्या ट्रेडिंग सत्रात मायक्रोसॉफ्टच्या शेअरमध्ये 1.6 टक्क्यांनी वाढ झाली, ज्यामुळे त्याचे वॅल्यूएशन $2.875 ट्रिलियनपर्यंत वाढले. दुसरीकडे, अॅपलच्या शेअर्समध्ये 0.9 टक्क्यांनी घसरण झाली. त्याचे वॅल्यूएशन $2.871 ट्रिलियनवर आले. दरम्यान या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, Apple चे शेअर्स 3.3 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याचवेळी, मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये 1.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अॅपलच्या शेअर्समध्ये घट होण्याचे कारण

न्यूज एजन्सी रॉयटर्सने असे वृत्त दिले की, आयफोनच्या सेल्स ग्रोथबाबत अॅपलचे रेटिंग नुकतेच कमी करण्यात आले, ज्याचा परिणाम दिसून येत आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, अॅपलचा सर्व्हिस बिझनेस अलीकडच्या काळात ब्राइट स्पॉट राहिला. Google ला iOS मध्ये डिफॉल्ट सर्च इंजिन बनवण्याच्या करारावर सुरक्षेच्या कारणांमुळे Apple चे रेटिंग कमी झाले.

अॅपल आणि मायक्रोसॉफ्टची 2023 मध्ये कामगिरी

अॅपलच्या शेअर्समध्ये 2023 मध्ये चांगली वाढ झाली आणि त्याने 48 टक्के परतावा दिला. Apple चे मार्केट कॅप 14 डिसेंबर रोजी $3.081 ट्रिलियन पर्यंत पोहोचले होते. सध्या, अॅपल ही जगातील एकमेव कंपनी आहे, जिने 3 ट्रिलियन डॉलर्सच्या मार्केट कॅपला स्पर्श केला आहे. त्याचवेळी, मायक्रोसॉफ्टच्या शेअर्संनी 2023 मध्ये 57 टक्के परतावा दिला. AI कडे कंपनीचा वाढता कल हे स्टॉकच्या परताव्याचे कारण असल्याचे मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT