Ferrari  Dainik Gomantak
ग्लोबल

अडीच कोटींच्या फेरारीत जळून खाक झाला व्यापारी

ग्रीकच्या व्यापाऱ्याला महागात पडली फेरारीची सवारी

दैनिक गोमन्तक

Ferrari 488 sports car Burning: मोठी स्वप्न बघत, त्यासाठी पैसे साठवत कार घेण्याचे स्वप्न कोणताही व्यक्ती बघत असतो. मात्र त्याच कारची किंमत करोडोंमध्ये असेल आणि त्याच कारचा अपघात होत असेल तर यासारखे दुर्दैवही कोणते नाही. अशाच प्रकारचा भीषण अपघात ग्रीकमधील एका व्यक्तीसोबत घडला आहे. त्याने £250k (अंदाजे 25 दशलक्ष) किमतीची फेरारी 488 कार मोठ्या धूमधडाक्यात खरेदी केली. मात्र एका अपघातात त्याच गाडीत त्याचा जळून जागीच मृत्यू झाला.

'द सन'च्या वृत्तानुसार, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव Tzortzis Monoyios असून तो 45 वर्षाचा होता. तो व्यवसायाने व्यापारी होता. Tzortzis Monoyiosची Mykonos Islands मध्ये दोन कपड्यांची दुकाने आहेत. ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये ही दुर्घटना घडली. या अपघातात कार जळून खाक झाली. अपघातानंतर जे फोटो समोर आले आहेत ते बघून या अपघाताचे गांभिर्य लक्षात येते.त्या व्यापाऱ्याने त्याची महागडी कार फक्त 3 किमी चालवली. त्यानंतर कारला अचानक आग लागली. अपघातानंतर Tzortzis Monoyiosचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

जेव्हा अपघात झाला तेव्हा त्याची पत्नीही त्याच्यासोबत होती. मात्र, सुदैवाने ही कार जळून खाक झाली तेव्हा ग्रीक सिंगर स्टॅन या कारच्या ​​मागे होता. त्यांची कारही फेरारी कारच्या मागे होती. त्याने व्यापाऱ्याच्या पत्नीचे प्राण वाचवले. कार अपघाताचा व्हिडिओ ग्रीक न्यूज साइट इफिमेरिडावरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. अपघातात मृत्यू झालेला Tzortzis मोनोयिओस 2003 मध्ये ग्रीसमधील द वॉल या रिअॅलिटी शोमध्येही दिसला होता. तेव्हा तो 23 वर्षांचा कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT