South Korea Battery Plant Fire Dainik Gomantak
ग्लोबल

South Korea Fire Incident: दक्षिण कोरियातील लिथियम बॅटरी प्लांटला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू

Battery Plant Fire: दक्षिण कोरियातील बॅटरी प्लांटला लागलेल्या भीषण आगीत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

Manish Jadhav

South Korea Battery Plant Fire: दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या दक्षिणेला ह्वासेओंगजवळ सोमवारी लिथियम बॅटरी बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

रॉयटर्सने योनहाप वृत्तसंस्थेचा हवाला देत सांगितले की, सोमवारी दक्षिण कोरियातील लिथियम बॅटरी प्लांटमध्ये आग लागली. आग एवढी भीषण होती की, आगीच्या ज्वाळा मोठ्या उंचीवर उठताना दिसत होत्या. बचाव कार्यादरम्यान 20 लोक बेपत्ता झाले आहेत. 20 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांचे रजिस्टर जळाले असल्याने मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून मृतांमध्ये चीन आणि इतर देशांतील नागरिकांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा प्लांटमध्ये 67 लोक काम करत होते. आग विझवण्याचे युद्धपातळीवर सुरु आहेत.

दक्षिण कोरियाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.30 च्या सुमारास ही आग लागली. राजधानी सेऊलच्या दक्षिणेला ह्वासेओंग येथील लिथियम बॅटरी कारखान्यात ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आग लागली तेव्हा कारखान्यात सुमारे 67 लोक उपस्थित होते. कारखाना जळून खाक झाल्याने मालकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT