London Crime Dainik Gomantak
ग्लोबल

London Crime: लंडनमध्ये वृद्धाकडून 77 वर्षीय पत्नीची बॅटने ठेचून हत्या, पोलिसही चक्रावले

London Crime: लंडनमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका वृद्ध व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत असे कृत्य केले, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.

Manish Jadhav

London Crime: लंडनमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका वृद्ध व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत असे कृत्य केले, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. या शीख वृद्ध व्यक्तीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिलीच, पण आता 29 सप्टेंबर 2023 रोजी त्याला या गुन्ह्याची शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

जे ऐकून पोलिसांना धक्काच बसला

खरे तर, 79 वर्षीय ब्रिटिश शीख वृद्ध व्यक्ती पत्नी माया देवी आणि तीन मुलांसह लंडनमध्ये राहतात. एके दिवशी ते लंडनमधील (London) पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली देताना त्यांनी सांगितले की, 'मी माझ्या 77 वर्षीय पत्नीची बॅटने ठेचून हत्या केली.' हे ऐकून पोलिसांना धक्काच बसला.

न्यायालय आता 29 सप्टेंबर 2023 रोजी आरोपीला शिक्षा सुनावणार

दरम्यान, पोलिसांनी (Police) घटनास्थळी जाऊन पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मायाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरसेम सिंग असे आरोपीचे नाव आहे. त्याला तीन मुले आहेत. न्यायालय आता 29 सप्टेंबर 2023 रोजी आरोपींना शिक्षा सुनावणार आहे.

यामागील कारणांबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही

सध्या पोलीस डॉक्टरांच्या मदतीने तरसेम यांची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हत्येचे कारण काय, याबाबत वारंवार विचारणा करुनही त्यांनी आजपर्यंत कोणताही खुलासा केलेला नाही.

आतापर्यंतच्या तपासात घरगुती कलहातून आरोपीने या वयात हा गुन्हा केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, पोलिस या प्रकरणाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत.

पोलीस तिन्ही मुलांच्या पाठीशी आहे

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही तिन्ही मुलांसोबत आहोत. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, पण ती अशी कोणती गोष्ट होती, ज्यावरुन तो अचानक एवढा हिंसक झाला, हे अद्याप तरी कळलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji Cricket: गोव्याच्या मोहिमेला यंदा घरच्या मैदानावर आरंभ! चंदीगडसोबत रंगणार सामना; 15 ऑक्टोबरपासून थरार

कोकणात 22 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय मुलीचा खून का केला? घटनास्थळी सापडली नायलॉनची दोरी, कात्री आणि सॅनिटरी पॅड

Sanguem: ..अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! सांगेतील माय-लेकीला मिळाला हक्काचा निवारा; मंत्री फळदेसाईंचा पुढाकार

Goa News Live: सुर्ल फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला; रुपेश नाईक आणि अनिकेत नावेळकरला अटक

'रामा'च्या न्यायासाठी पणजीत काढलेला मोर्चा अवैध असल्याचा आरोप; युरी आलेमाव, विजय सरदेसाई यांच्यासह 450 जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT