Joe Biden  Dainik Gomantak
ग्लोबल

America: गोळीबाराने महासत्ता हादरली, घेतला 'हा' मोठा निर्णय; बायडन सरकार चिंतेत

America News: अमेरिकेतील एका कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या गोळीबारानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

Manish Jadhav

America News: अमेरिकेतील एका कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या गोळीबारानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

कॅम्पसमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित वार्षिक पार्टी दरम्यान गोळीबार झाल्यानंतर शनिवारी सकाळी पोर्टलँड, मेनमधील एका महाविद्यालयाने कॅम्पसमध्ये लॉकडाऊन लागू केला.

अमेरिकेतील तरुण असो की विद्यार्थी, गोळीबाराची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. गोळीबाराच्या अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे बायडन प्रशासनही चिंतेत आहे.

दरम्यान, कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या गोळीबाराच्या ताज्या प्रकरणात, कोल्बी कॉलेजने सांगितले की, वॉटरव्हिल, मेन येथील अल्फॉन्ड सीनियर अपार्टमेंटमध्ये झालेल्या वादात गोळीबार झाला.

मात्र, कोणत्याही विद्यार्थ्याला (Student) गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, गोळीबार करणारा संशयित कॉलेजचा नसल्याचे कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलीस (Police) कसून तपास करत आहेत.

याआधी, अमेरिकेतील मिसिसिपी येथील टेट काउंटीमधील अर्काबुतला नगर येथे वेगवेगळ्या ठिकाणी 6 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

अधिकार्‍यांनी एका व्यक्तीवर हत्येचा आरोप केला आणि हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीला अटक केल्याचे सांगितले. बेली मार्टिन, मिसिसिपी डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीचे प्रवक्ते यांनी अर्काबुतला, टेट काउंटीमधील हत्येची पुष्टी केली.

टेक्सासमध्येही गोळीबार झाला होता

अमेरिकेतील टेक्सासमध्ये नुकतीच गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक्सासमधील एल पासो येथील एका शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. गोळीबार झाल्याने मॉलमध्ये घबराट पसरल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस प्रवक्ते रॉबर्ट गोमेझ यांनी सांगितले की, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. येथे 3 ऑगस्ट 2019 रोजी एका बंदूकधाऱ्याने 23 जणांची हत्या केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT