Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

संगीत ऐकणं पडंल महाग, तालिबान्यांनी 13 जणांची गोळ्या घालून केली हत्या

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवून तेथे कट्टरपंथी नियम लागू केले आहेत.

दैनिक गोमन्तक

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवून तेथे कट्टरपंथी नियम लागू केले आहेत. त्यातच आता या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल लोकांना गोळ्या घातल्या जात आहेत. तालिबान राजवटीत संगीत ऐकणे किंवा आपल्या आवडीचे कपडे घालणे देखील प्रतिबंधित झाले आहे. आता नांगरहार प्रांतात (province of Nangarhar) तालिबानने 13 जणांची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. हे लोक लग्न समारंभासाठी आले होते. जिथे ते संगीत ऐकत होते. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह (Amrullah Saleh) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'लग्न समारंभात वाजणारे संगीत बंद करण्यासाठी तालिबानी सैनिकांनी नांगरहार प्रांतात 13 लोकांची हत्या केली आहे.' अमरुल्लाह सालेह म्हणाले, 'प्रतिकार ही देशाची गरज आहे' आणि केवळ टीका पुरेशी नाही (Music in Taliban Rule). ते पुढे म्हणाले, “आम्ही केवळ निषेध करुन आपला राग व्यक्त करु शकत नाही.” माजी उपराष्ट्रपती आणि स्वतःला अफगाणिस्तानचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणवून घेणारे सालेह यांनी या कथित हत्याकांडासाठी पाकिस्तानला (Pakistan) जबाबदार धरले आहे.

या हत्याकांडासाठी पाकिस्तान जबाबदार

'पाकिस्तानने तालिबानला 25 वर्षे प्रशिक्षण देण्यात आले, जेणेकरुन अफगाणिस्तानची संस्कृती नष्ट व्हावी. तसेच इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या कट्टरतेला अफगाणिस्तानमध्ये वाव देण्यात यावा जेणेकरुन त्यांना आपल्या देशावर नियंत्रण ठेवता येईल. आता तेच काम चालू आहे. ही राजवट टिकणार नाही पण दुर्दैवाने, त्याच्या शेवटपर्यंत, अफगाण लोक त्याची किंमत चुकवत राहतील, असे सालेह यांनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. सोशल मीडियावर (Taliban Strict Rules in Afghanistan) लोक सालेहला पाठिंबा देत आहेत. त्यांच्या पोस्टवर टिप्पणी करताना एका यूजर्सने म्हटले आहे की, ही घटना पूर्णपणे सत्य असून देशातील कोणत्याही स्वतंत्र मीडियाला त्याची माहिती नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT