Terrorist Habibullah Dainik Gomantak
ग्लोबल

Terrorist Habibullah: भारताचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तानात ठार; अज्ञात बंदूकधाऱ्यांनी साधला डाव

Lashkar-e-Taiba Terrorist Habibullah: पाकिस्तानमध्ये या वर्षात अनेक दहशतवादी आणि खलिस्तानी मारले गेले.

Manish Jadhav

Lashkar-e-Taiba Terrorist Habibullah: पाकिस्तानात या वर्षभरात अनेक दहशतवादी आणि खलिस्तानी मारले गेले. या मालिकेत आता लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी हबीबुल्लाच्या मृत्यूची बातमी आली आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा निकटवर्तीय सहकारी हबीबुल्लाह याची रविवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर गोळीबार केला, ज्यात तो ठार झाला. उरी येथील दहशतवादी हल्ल्यात हबीबुल्लाचा हात होता. हा हल्ला 2016 मध्ये झाला होता, त्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केली होती.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये अशा प्रकारे सुमारे डझनभर दहशतवादी मारले गेले आहेत. या दहशतवाद्यांमध्ये बिलाल मुर्शिद, अक्रम गाझी, अबू कासिम यांसारख्या अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे. खैबर पख्तूनख्वामधील टँक जिल्ह्यातील या घटनेमुळे भारताला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमांइड दाऊद इब्राहिमही रुग्णालयात दाखल आहे. त्याला काही अज्ञात व्यक्तीने विष दिल्याचे वृत्त असून त्याला उपचारासाठी पाकिस्तानातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुसरीकडे, दाऊद कराचीत राहतो हे पाकिस्तानने नेहमीच नाकारले आहे. अशा स्थितीत तो दाऊदच्या स्थितीवर भाष्य करु शकणार नाही. अलीकडेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला पाकिस्तानमध्ये मारल्या जाणार्‍या भारताच्या शत्रूंबद्दल विचारले असता, आम्हाला त्याला भारतात आणायचे आहे, असे त्यांनी म्हटले होते.

परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- आम्हाला त्याला भारतात आणायचे आहे...

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले की, 'भारताला त्याला न्याय प्रक्रियेअंतर्गत येथे शिक्षा द्यायची आहे. दाऊदला भारताकडे सोपवावे, असे आमचे मत आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवडाभरात टँक जिल्हा चर्चेत येण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या आठवड्यातच जिल्ह्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 23 पोलीस आणि जवान शहीद झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

VIDEO: 'ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर'! टीम इंडियाच्या विजयानंतर मोहसिन नक्वीची फजिती; भारतीय चाहत्यांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT