Emir Sheikh Meshaal Al Ahmed Al Jabar Dainik Gomantak
ग्लोबल

संसद बरखास्त अन् संविधान सस्पेंड... ‘या’ श्रीमंत मुस्लिम देशात एका व्यक्तीने उलथवली संपूर्ण सत्ता

Kuwait Political Crisis: तेलसंपन्न आखाती देश कुवेतमध्ये नवे राजकीय संकट उभे राहिले आहे. कुवेतच्या अमीराने शुक्रवारी देशाची संसद बरखास्त केली.

Manish Jadhav

Kuwait Political Crisis: तेलसंपन्न आखाती देश कुवेतमध्ये नवे राजकीय संकट उभे राहिले आहे. कुवेतच्या अमीराने शुक्रवारी देशाची संसद बरखास्त केली. कुवेती प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद बरखास्त केल्यानंतर अमीराने काही सरकारी खात्यांचा ताबा आपल्या हाती घेतला. याशिवाय, अमीराने देशातील काही कायदेही मोडले आहेत. कुवेत न्यूज एजन्सी KUNA नुसार, अमीराने नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याचे आणि संविधानाच्या काही कलमांना चार वर्षांहून अधिक काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. पुढे असे लिहिले की, अमीर शेख मेशाल अल अहमद अल जबर नॅशनल असेंब्ली घेत आहेत.

संसद का बरखास्त केली?

"देश सध्या कठीण काळातून जात आहे, ज्यामुळे देशाच्या हितांचं रक्षण करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत," असे म्हणत अमीराने संसद विसर्जित करण्याची घोषणा केली. ते पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत सरकारी विभागांमध्ये भ्रष्टाचाराचं पेव फुटलं आहे, भ्रष्टाचारामुळे देशातील वातावरण बिघडत आहे. दुर्दैवाने, सुरक्षा आणि आर्थिक संस्थांमध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार आहे. तसेच, न्याय व्यवस्थेत भ्रष्टाचार वाढला आहे.

वर्षानुवर्षे सुरु असलेले राजकीय संकट

कुवेतला गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत राजकीय वादांनी वेढले आहे. या संकटात देशाची कल्याणकारी व्यवस्था ही एक प्रमुख समस्या असल्याचे सांगण्यात आले. सरकारला कर्ज घेण्यापासून रोखण्यातही आले आहे. यामुळे तेलसाठ्यातून प्रचंड नफा मिळत असला तरी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सरकारी तिजोरीत पैसा नाहीये. इतर अरब देशांप्रमाणे कुवेतमध्येही राजेशाही व्यवस्था आहे, परंतु येथील विधिमंडळ शेजारील देशांपेक्षा अधिक शक्तिशाली मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT