Kim Jong-Un Dainik Gomantak
ग्लोबल

North Korea: किम जोंग उनचा तालिबानी फर्मान, आपल्या मुलीच्या नावावरुन...

Kim Jong-Un: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने एक फर्मान जारी केला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये घबराट पसरली आहे.

Manish Jadhav

North Korea: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने एक फर्मान जारी केला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये घबराट पसरली आहे. उत्तर कोरियातील अधिकारी किम जोंग उन यांच्या मुलीचे नाव असलेल्या मुली आणि महिलांना त्यांची ओळख बदलण्यास भाग पाडत आहेत.

फॉक्स न्यूजने आपल्या वृत्तात ही माहिती दिली आहे. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या मुलीचे नाव जू ए असे असून तिचे वय नऊ ते 10 वर्षे असल्याचे समजते.

दरम्यान, या ताज्या आदेशावरुन अनेक अर्थ काढले जात आहेत. किम जोंगला आपल्या मुलीला एक वेगळी ओळख द्यायची आहे, असे बोलले जात आहे. फॉक्सच्या बातम्या रेडिओ फ्री एशियाच्या अहवालावर आधारित आहेत, ज्यात उत्तर कोरियामधील (North Korea) दोन अज्ञात स्त्रोतांचा हवाला देण्यात आला आहे. यापैकी एक स्रोत उत्तर प्योंगयांगमध्ये राहतो आणि दुसरा दक्षिण प्योंगयांगमध्ये राहतो.

दुसरीकडे, जू ए नुकतीच उत्तर कोरियाच्या लष्करी परेडदरम्यान तिच्या वडिलांसोबत सार्वजनिकपणे दिसली होती. परेडच्या एक दिवस आधी, तिला लष्कराच्या (Army) बॅरेकमध्ये एका भव्य मेजवानीतही पाहिले गेले. किम जोंगची मुलगी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा मीडिया आणि जगासमोर आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT