Kenya helicopter crash near Mount Ololokwe with seven people killed Dainik Gomantak
ग्लोबल

Kenya Helicopter Crash: पहाटेचा तो प्रवास ठरला शेवटचा! केनियात हेलिकॉप्टर क्रॅश, इक्वाडोरच्या गुप्तचर प्रमुखासह 7 जण ठार VIDEO

Eurocopter EC130 B4 Crash: केनियाच्या मध्य भागात बुधवारी (19 ऑगस्ट) सकाळी झालेल्या एका अत्यंत भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत 5 अमेरिकन नागरिक आणि इक्वाडोरचे गुप्तचर प्रमुख मिशेल सेन्सी-कॉन्तुगी यांच्यासह 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Manish Jadhav

Kenya Helicopter Crash: केनियाच्या मध्य भागात बुधवारी (19 ऑगस्ट) सकाळी झालेल्या अत्यंत भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत 5 अमेरिकन नागरिक आणि इक्वाडोरचे गुप्तचर प्रमुख मिशेल सेन्सी-कॉन्तुगी यांच्यासह 7 जणांचा मृत्यू झाला. 'सीएनएन'च्या वृत्तानुसार, केनियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने माहिती दिली की, संबुरु काउंटीमधील माउंट ओलोलोकवे येथे हे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमधील सर्व सातही जणांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची माहिती संबुरु काउंटीचे पोलीस कमांडर डेव्हिड नकोरो यांनी दिली.

हे हेलिकॉप्टर '&Beyond' या लक्झरी टूर एजन्सीच्या लोकांना घेऊन जात होते. ऑपरेटर 'लेडी लॉरी हेलिकॉप्टर्स'नुसार, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मृतांमध्ये इक्वाडोरच्या गुप्तचर यंत्रणेचे महासंचालक मिशेल सेन्सी-कॉन्तुगी, त्यांची पत्नी व फॅशन डिझायनर स्टेफनी सेन्सी आणि स्पॅनिश टेलिव्हिजन कंपनी 'टेलिमुंडो'चे कार्यकारी अधिकारी जोस सुआरेझ यांचा समावेश आहे. इक्वाडोरच्या राष्ट्रपती कार्यालयाने या घटनेवर दुःख व्यक्त केले.

तर दुसरीकडे, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने या अपघातात पाच अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूला दुजोरा दिला. केनियातील (Kenya) अमेरिकन दूतावास तेथील स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून पीडितांच्या कुटुंबांना सर्व आवश्यक ती मदत पुरवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अपघातग्रस्त ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु असले तरी कठीण रस्ता आणि घटनास्थळी लागलेल्या आगीमुळे या कार्यात मोठे अडथळे येत असल्याचे 'केनिया रेड क्रॉस'ने सांगितले. बचावकार्याला गती देण्यासाठी इसिओलो येथून अतिरिक्त पथक रवाना करण्यात आले.

अपघातग्रस्त 'युरोकॉप्टर EC130 B4' हे सिंगल-इंजिन हेलिकॉप्टर लोईसाबा अभयारण्यातून एवासो नगीरो नदीच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. एयरबस कंपनीचे हे हेलिकॉप्टर एका पायलटसह पाच ते सात प्रवाशांना नेण्यास सक्षम असते. सध्या केनियाच्या वाहतूक मंत्रालयाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT