अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden), त्यांची पत्नी जिल, उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) आणि त्यांचा नवरा डग्लस यांनी 2020 च्या कमाईचा परतावा जाहीर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बायडन यांच्या अडीच पट अधिक उत्पन्न कमला हॅरिस यांचे आहे. बायडन यांचे जेवढे उत्पन्न आहे, त्यापेक्षा जास्त टॅक्स कमला हॅरिस भरतात. 2019 पेक्षा 2020 मध्ये बायडन यांचे उत्पन्न घटले आहे. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांची शिक्षक पत्नी जिल यांनी सन 2020 मध्ये सुमारे सहा लाख सात हजार डॉलर्सची (4 कोटी 43 लाख रुपये) कमाई केली. 2019 मध्ये बायडन जोडप्याचे उत्पन्न 9 लाख 85 हजार डॉलर्स (सुमारे सात कोटी 18 लाख रुपये) होते. 2019 च्या तुलनेत मागील वर्षी त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे.
उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि पती डग्लस एमहॉफ यांची 2020 मध्ये संपत्ती जवळ जवळ 17 लाख डॉलर्स (12 कोटी 38 लाख रुपये) होती. या दोघांनी सरकारला 6 लाख 21 हजार डॉलर्सचा टॅक्स दिला आहे. कमला हॅरिस यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीने मिळविलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त मिळकतकर भरला आहे. कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्नियामध्ये 1.25 दशलक्ष डॉलर्स कर भरला आणि त्यांच्या पतीने कोलंबियामध्ये 56 हजार डॉलर्सचा कर भरला. 2020 मध्ये त्यांनी 27 हजार डॉलर्स दान केले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष आणि त्यांची पत्नी यांनीही 30 हजार डॉलर्स दान केले होते. म्हणजेच त्यांनी आपल्या उत्पन्नातील 5.1 टक्के रक्कम देणगी स्वरूपात दिली होती. अमेरिकन कायद्यानुसार अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींनी त्यांची आर्थिक माहिती सार्वजनिक केली पाहिजे. म्हणूनच दोन्ही परताव्यांची माहिती व्हाईट हाऊसमधून सार्वजनिक करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.