Kamala Harris is alarmed by the dire situation in India Said
Kamala Harris is alarmed by the dire situation in India Said  
ग्लोबल

भारतातील भयावह परिस्थितीमुळे कमला हॅरिस झाल्या उद्विग्न; म्हणाल्या....

दैनिक गोमंतक

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस (US Vice President Kamala Harris) यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करणाऱ्या भारताला सर्वोतपरी मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. हॅरिस यांनी ‘’भारताने (India) कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्हांला मदत केली होती. आणि आता आम्ही भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी दृढ निश्चयाने उभे आहोत,’’ असं म्हटलं आहे. (Kamala Harris is alarmed by the dire situation in India Said) 

भारतामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढणं हे ह्रदय पिळवटून टाकणारं असल्याचं देखील हॅरिस म्हणाल्या आहेत. तुमच्यापैकी ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तिंना कोरोना काळात गमावलं आहे त्यांच्याप्रती माझ्या सदभावना आहेत, अशा शब्दामध्ये अमेरिकेच्या उपराष्ट्रध्यक्षा कमला हॅरिस यांनी भारतीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतामधील कोरोनाची परिस्थिती अधिक चिंताजनक होत असताना आम्ही त्वरित भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचं हॅरिस यांनी म्हटलं.

26 एप्रिल रोजी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन(Joe Biden) यांनी भारताला मदत करण्यासंदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी चर्चा केल्याची माहितीही हॅरिस यांनी यावेळी दिली. 30 एप्रिलपर्यंत अमेरिकेच्या नागरिकांनी आणि लष्करांनी भासतासाठी मदतीची पहिली खेप पाठवली होती. आम्ही रिफिल करता येतील असे ऑक्सिजन सिलेंडर्स (Oxygen Cylinder), ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स, एन 95 मास्क देत आहोत. त्याचबरोबर रेमडिसिव्हीर (Remdesivir) औषधांचा साठाही आम्ही भारताला पाठवला असल्याचे हॅरिस यांनी सांगितलं. 

तसेच कमला हॅरिस यांनी भारत आणि अन्य देशांमध्ये वेगाने कोरोना लसीकरण करण्यासाठी मदत करणार असल्याचेही म्हटलं आहे. आम्ही कोरोना लसींवरील असणारा स्वामित्व हक्क संपवण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्या म्हणाल्या. भारताला आम्ही या कठिण परिस्थितीमध्ये पूर्ण पाठिंबा देत असल्याची घोषणा त्यांनी केली. अमेरिकेत आणि भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचेही त्यांनी नमूद केलं आहे. 

आम्ही भारताचे एक मित्र म्हणून आणि क्वॉड देशांचे सदस्य म्हणून तसेच जागतिक समूहाचा एक भाग म्हणून भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचं हॅरिस यांनी सांगितलं. भारताला कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी कायम आहोत असा विश्वास हॅरिस यांनी यावेळी बोलताना दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

SCROLL FOR NEXT