Kabul Blast: Taliban Attacks on IS hideout  Dainik Gomantak
ग्लोबल

Kabul Blast: तालिबानने काढला वचपा,IS च्या अड्ड्यावर हल्ला

तालिबान सैन्याने काबूलमध्ये (Kabul Blast) इस्लामिक स्टेट (IS) चा अड्डा नष्ट केला आहे

दैनिक गोमन्तक

तालिबानने (Taliban) इस्लामिक स्टेट (IS) च्या अड्ड्यावर हल्ला केला आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तालिबान सैन्याने काबूलमध्ये (Kabul) इस्लामिक स्टेट (IS) चा अड्डा नष्ट केला आहे. तालिबानने सोमवारी सांगितले की, तालिबान सैन्याने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आयएसच्या स्थानांवर हल्ला केला आहे. काबूलमधील एका मशिदीबाहेर स्फोट झाल्यानंतर काही वेळातच तालिबान सैन्याने हल्ला केला आहे . या दरम्यान तालिबान्यांनी एक अड्डा नष्ट केला आहे. (Kabul Blast: Taliban Attacks on IS hideout)

काल अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमधील एका मशिदीच्या बागेत बॉम्ब स्फोट झाला होता, ज्यामध्ये किमान आठ जण ठार झाले होते. तालिबानच्या अंतर्गत मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की,. कारी सईद खोस्ती यांनी या मृत्यूंची पुष्टी केली आहे. सुरुवातीच्या अहवालात असे दिसून आले आहे की हा स्फोट रस्त्याच्या कडेला झाला आहे. तालिबानचे अधिकृत प्रवक्ते बिलाल करीमी यांनी सांगितले की, या प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

तालिबानने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, तालिबानने उत्तर काबूलमधील खैर खाना परिसरातील इस्लामिक स्टेट ऑपरेशन सेंटरवर कारवाई केली. मात्र या लष्करी कारवाईमध्ये आयएसचे किती दहशतवादी मारले गेले याबद्दल अधिक माहिती दिली गेली नाही

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील मशिदीच्या प्रवेशद्वारावर रविवारी मोठा बॉम्बस्फोट झाला होता. सत्ताधारी तालिबानचे ) प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांच्या आईच्या मृत्यूनंतर मशिदीत नमाज अदा केली जात असताना हा स्फोट झाला होता . या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही पण संशय आयएस या दहशतवादी संघटनेवर होता. आणि या हल्ल्याला उत्तर देण्यासाठीच तालिबानने हा हल्ला केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT