Joe Biden Statement on Chicago shooting incident  Dainik Gomantak
ग्लोबल

गोळीबाराच्या घटनेवर बायडेन यांनी व्यक्त केला शोक, 'हिंसेविरुध्द संघर्ष सुरु राहणार'

त्यांनी यूएसमध्ये बंदुकीची हिंसा संपवण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा संकल्प केला.

दैनिक गोमन्तक

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी शिकागो उपनगरात 4 जुलैच्या स्वातंत्र्यदिनाच्या परेडमध्ये झालेल्या जीवघेण्या गोळीबाराबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी यूएसमध्ये बंदुकीची हिंसा संपवण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा संकल्प केला.

इलिनॉयच्या हायलँड पार्कच्या उत्तरेकडील उपनगरातील यूएस स्वातंत्र्यदिनाच्या परेडमध्ये झालेल्या गोळीबारात सहा जण ठार झाले आणि 24 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

"जिल (पत्नी) आणि मी या स्वातंत्र्यदिनी अमेरिकन समुदायाला पुन्हा एकदा दु:ख देणार्‍या बंदुकीच्या हिंसाचाराने हैराण झालो आहोत," बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. बायडेन म्हणाले, "मी बंदुकीच्या हिंसाचाराच्या विरोधातील लढा संपवणार नाही."

एका बंदूकधाऱ्याने टेरेसवर लपलेल्या जागेवरून गोळीबार केला. संशयित अद्याप फरार आहेत. अलीकडच्या काळात अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या परेडचे गोळीबार ही दुर्दैवी घटनांमधली ताजी घटना आहे.

बंदूक नियंत्रणाची मागणी तीव्र होत आहे

मे महिन्यात झालेल्या दोन हत्याकांडानंतर अमेरिकेत बंदूक नियंत्रणाची मागणी जोरात होत आहे. 24 मे रोजी टेक्सासमधील एका प्राथमिक शाळेत झालेल्या गोळीबारात 21 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश लहान मुले होती. 14 मे रोजी न्यूयॉर्कमधील बफेलो येथील एका सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात 10 कृष्णवर्णीयांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT