Jill Biden Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: 'अचानक', अमेरिकेची फर्स्ट लेडी युध्दग्रस्त युक्रेनमध्ये !

अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नी जिल बायडन रविवारी अचानक पश्चिम युक्रेनला पोहोचल्या.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नी जिल बायडन रविवारी अचानक पश्चिम युक्रेनला पोहोचल्या. इथे त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या पत्नी ओलेना झेलेन्स्की यांची भेट घेतली. जिल यांनी ओलेना यांना सांगितले की, मला मदर्स डे ला इथे यायचे होते. अमेरिकेतील (America) जनता तुमच्या पाठीशी खंभीरपणे उभी आहे. युक्रेनच्या (Ukraine) सीमेला लागून असलेल्या स्लोव्हाकियामधील एका गावात असलेल्या शाळेत राष्ट्रप्रमुखांच्या पत्नी भेटल्या. त्यांनी एका छोट्या वर्गात बसून एकमेकींशी वार्तालाप केला. जिल युक्रेनमध्ये तब्बल दोन तास थांबल्या. (Jill Biden wife of US President Joe Biden visited Ukraine)

दरम्यान, ओलेना यांनी जिल यांचे आभार मानले. ओलेना यांनी यावेळी म्हटले की, 'युद्धादरम्यान अमेरिकेच्या फर्स्ट लेडीचे इथे येण्याचे महत्त्व आपण समजू शकतो. दुसरीकडे, रशियन सैन्यांचे हल्ले अजूनही सुरु आहेत. हल्ले सुरु असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडीचे युक्रेनमध्ये दाखल होणं हे खरचं धाडसी पाऊल आहे.'

तसेच, मार्चच्या सुरुवातीला, पोलंड भेटीदरम्यान जो बायडन म्हणाले होते की, 'सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी न मिळाल्याने मी युक्रेनला जाऊ शकलो नाही, याबद्दल खंत आहे.' अलीकडेच, व्हाईट हाऊसने सांगितले की, 'राष्ट्राध्यक्षांना युक्रेनला जाऊ शकतात, परंतु सध्या त्याबाबत कोणतीही योजना नाही.'

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो अचानक युक्रेनमध्ये पोहोचले

त्याचवेळी, कोणत्याही पूर्वनियोजित कार्यक्रमाशिवाय युक्रेनमध्ये पोहोचलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी उद्ध्वस्त झालेल्या इरपिन शहराला भेट दिली. युक्रेनचे मीडिया इन्स्टिट्यूट आणि इरपिनचे महापौर ऑलेक्झांडर मार्कुशिन यांनी ही माहिती दिली आहे. तथापि, कॅनडाच्या (Canada) अधिकार्‍यांनी ट्रुडो यांच्या भेटीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT