Japan Dainik Gomantak
ग्लोबल

Japan: सुशी दहशतवाद? जपानी वेट्रेसने स्वत:चे रक्त मिक्स केलेले कॉकटेल दिले ग्राहकाला

जपानमधील कॅफे "सुशी दहशतवाद" यामुळे अडचणीत आल्याचा दावा CNN ने केला आहे.

Pramod Yadav

जपानच्या होक्काइडो, सपोरो येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. कॅफेमधील एका वेट्रेसने स्वत:चे रक्त कॉकटेलमध्ये मिक्स केले व तेच ग्राहकाला दिल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

ओरिकाकू किंवा मूळ कॉकटेल म्हणून ओळखल्या जाणार्‍या पेयांमध्ये फळे किंवा इतर रंगीबेरंगी सिरप असतात. याच कॉकटेलमध्ये तिने रक्त मिक्स केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

घटना समोर आल्यानंतर कॅफेने महिला वेट्रेसला खडे बोल सुनावत तिची कामावरून हकालपट्टी केली आहे. तसेच, 'अशा प्रकारच्या घटना अतिशय धक्कादायक असून, त्या अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत,' असे कॅफेच्या वतीने ट्विटरवरती स्पष्ट केले आहे. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर कॅफे एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आला होता. या वेळेत कॅफेमधील सर्व ग्लास बदलण्यात आले.

जपानी नाव असलेल्या या कॅफेच्या नावाचे इंग्रजी भाषांतर "प्रॉब्लेम चाइल्ड कॉन्सेप्ट कॅफे" असे होत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे कॅफेची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर मालकाने याबाबत खुलासा जारी करत दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.

कॅफेच्या वतीने 2 एप्रिल रोजी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. "थोड्या काळासाठी आम्ही कॅफे बंद ठेवत आहोत, यावेळेत दूषित झालेल्या अल्कोहोलची विल्हेवाट लावली जाईल. दुकान आणि ग्लास देखील स्वच्छ केले जातील. तुम्हाला त्रास झाल्याबद्दल खेद वाटतो.” असे ट्विट कॅफेच्या वतीने करण्यात आले आहे.

सुशी दहशतवाद?

जपान थीम कॅफेसाठी प्रसिद्ध आहे. टोकियोच्या प्रसिद्ध अकिहाबारा परिसरात, तुम्हाला साप कॅफे, निन्जा-थीम असलेले मनोरंजन रेस्टॉरंट आणि विविध प्रकारचे मेड आणि बटलर कॅफे मिळू शकतात.

दरम्यान, येथील कॅफे "सुशी दहशतवाद" यामुळे अडचणीत आल्याचा दावा CNN ने केला आहे. याभागात सोया सॉसच्या बाटल्या आणि इतर जेवणासाठी बनवलेले अन्न दूषित केल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे CNN ने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT