Japanese Prime Minister Fumio Kishida Dainik Gomantak
ग्लोबल

Japanese PM in Delhi: जपानचे पंतप्रधान 'फुमियो किशिदा' दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर

जपानचे पंतप्रधान 'फुमियो किशिदा' दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले आहोत.

दैनिक गोमन्तक

Japanese Prime Minister Fumio Kishida arrives in Delhi: संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक आणि उच्च तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंध अधिक विस्तारित करण्याच्या उद्देशाने किशिदा आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचले आहेत.

या दौऱ्यात चीनच्या वाढत्या लष्करी आक्रमकतेमुळे इंडो-पॅसिफिक प्रदेशातील उदयोन्मुख आव्हाने, यावर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि किशिदा यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी पंतप्रधान फुमियो किशिदा यांचे स्वागत केले आहे

जपानचे पंतप्रधान किशिदा यांच्या स्वागतावेळी मराठमोळी लावणी लावण्यात आली होती. वाजले की बारा या लावणीवर नाचणाऱ्या मुलींना पाहून त्यांचे नृत्य पाहण्याचा मोह जपानच्या पंतप्रधानांनाही आवरला नाही. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे देखील उपस्थित होते. किशिदा यांनी काही वेळ थांबून लावणी नृत्य पाहिले.

पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता जपानच्या पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. इंडो पॅसिफिकसह अनेक मुद्द्यांवर चर्चा दोघांमध्ये चर्चा होणार आहे. या भेटीत, किशिदा मुक्त आणि मुक्त इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी आपल्या योजनेबाबत माहिती देऊ शकतात.

चीनच्या वाढत्या लष्करी आक्रमकतेमुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील उदयोन्मुख आव्हानांवर मोदी आणि किशिदा यांच्यात चर्चा होऊ शकते. यादरम्यान दोन्ही नेते मुक्त इंडो-पॅसिफिकसाठी आपली भूमिका स्पष्ट करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT