Israeli's Air Strike on Hamas facilities Dainik Gomantak
ग्लोबल

Air Strike: हमासच्या दहशतवादी हल्ल्याला इस्रायलचे प्रतिउत्तर

इस्रायली लढाऊ विमानांनी रविवारी गाझा पट्टीतील (Gaza Border) इस्लामिक हमास चळवळीच्या केंद्रांवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत (Air Strike)

दैनिक गोमन्तक

इस्लामिक हमास (Hamas) चळवळीच्या दहशतवाद्यांनी (Terrorists Attack) केलेल्या रॉकेट हल्ल्यांना(Rocket Attack) इस्रायलने (Israel) चोख प्रत्युत्तर दिले आहे. वृत्तसंस्था IANS च्या अहवालानुसार, इस्रायली लढाऊ विमानांनी रविवारी गाझा पट्टीतील (Gaza Border) इस्लामिक हमास चळवळीच्या केंद्रांवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत (Air Strike) . सूत्रांनी सांगितले की, इस्रायली लढाऊ विमानांनी सलग दुसऱ्या दिवशी मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीतील हमास लष्करी चौक्या आणि तळांना लक्ष्य केले आहे. (Israeli's Air Strike on Hamas facilities)

झिन्हुआ वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, इस्रायली हवाई दलाने हे हल्ले हवेतुन जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांद्वारे केले आहेत . यापूर्वी शुक्रवार आणि शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीवरून इस्रायलवर दोन रॉकेट डागले होते . त्यानंतर हमास संचालित अल-अक्सा दूरचित्रवाणीने सांगितले की प्रत्यक्षदर्शींनी इस्रायली लष्करी लढाऊ विमाने आणि ड्रोनचा आवाज ऐकला.

शुक्रवारी आणि शनिवारी अज्ञात दहशतवाद्यांनी गाझा पट्टीवरून इस्राईलच्या दिशेने दोन रॉकेट डागले, असे इस्रायली माध्यमांनी म्हटले आहे. अलीकडेच, इस्रायली लष्कराने सांगितले की त्याच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीतील दहशतवाद्यांच्या शस्त्रास्त्रांच्या अड्ड्यावर हल्ला केला आहे . इस्त्रायलच्या या लष्करी कारवाईत किती लोक मारले गेले किंवा जखमी झाले याबद्दल सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.

गेल्या महिन्यात, पॅलेस्टिनी आंदोलक आणि इस्रायली सैनिक यांच्या सीमेजवळ हिंसक चकमकी झाल्याच्या काही तासांनंतर इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांवर हवाई हल्ले केले होते. एपी या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, इस्रायली लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले होते की, हिंसक निदर्शनांना प्रतिसाद देण्यासाठी आणि दक्षिण इस्रायलला भडकव णारे फुगे पाठवून हिंसा अधिक भडकावल्यामुळे विमानांनी हमासच्या दहशतवादी निशाण्यांवर ही कारवाई केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT