Iran Dainik Gomantak
ग्लोबल

इस्त्रायली मोसादचे एजंट जाळ्यात अडकवले; इराणचा मोठा दावा

इराणकडून दावा करण्यात येत आहे की, इराणमध्ये दंगे घडविण्यासाठी हत्यारांचा वापर करायचा होता.

दैनिक गोमन्तक

जगभरात पेगॅसस प्रकरण (Pegasus Case) जागत असताना इराण ने दावा केला की, इस्त्रायल (Israel) गुप्तहेर संघटना असलेल्या मोसाद च्या (Mossad) संबंधित गुप्तहेरांच्या ग्रुपला पकडण्यात आले आहे. इराणच्या सरकारी माध्यमाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. ही अटक अशा पाश्वभूमीवर झाली आहे की, इराणमध्ये (Iran) दक्षिण पश्चिम भागात पाण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या सरकारी माध्यमाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार हत्यारे आणि दारु गोळ्याच्या साठ्याबरोबर मोसादच्या एजटंच्या एका ग्रुपला इराणच्या पश्चिमी सीमेवर घुसखोरी करताना पकडण्यात आले आहे. इराणकडून दावा करण्यात येत आहे की, इराणमध्ये दंगे घडविण्यासाठी हत्यारांचा वापर करायचा होता.

तथापि, स्टेट टीव्हीच्या मोसादच्या एजंट पकडण्यात आल्यासंबंधी विस्तारपूर्वक सांगण्यात आलेले नाही. कथित एजटंना अटक करण्यात आली आहे किंवा नाही हेही सांगण्यात आले नाही. पश्चिमकडे इराणला इराक आणि तुर्कीची सीमा संलग्नित आहे. इराणमधील खुजेस्तान प्रांतामध्ये पाण्यासंबंधी सुरु असलेल्या आंदोलनामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. संबंधित माहिती इराणच्या सरकारी आणि अर्धसरकारी प्रसारमाध्यमांकडून देण्यात आली आहे. दरम्यान इराण अशा लोकांना अटक करण्याच्या प्रयत्नात असतो की, जे अमेरिका आणि इस्त्रायलसाठी जासूसी करतात.

इस्त्रायलला इराण देश म्हणून मान्यता देत नाही

पश्चिमी इराणमध्ये इराणी सशस्त्र सेना आणि कुर्दीश अलगाववाद्यांबरोबर इस्लामिक स्टेट समूहाशी जोडलेल्या आतंकवादी यांच्याच युध्द सुरु आहे. जुलै 2020 मध्ये इराणकडून सांगण्यात येत आहे की, इराणचा प्रांत असलेल्या कुर्दीस्तानमध्ये हल्ला करण्यात आला त्यामध्ये दोन इराणी नागरिकांची हत्या करण्यात आली होती. इराण इस्त्रायलला देश म्हणून मान्यता देत नाही. तसेच प्रादेशिक क्षेत्रामध्ये इस्त्रायलच्या विरोधात सशस्त्र गटांच्या समूहांना मदत करतो. इराण लेबनॉन मधील शिया आतंकवादी हिजबुल्लाह समूह आणि पॅलेस्टिनी आतंकवाद्यांचा समूह असलेल्या हमासला पूर्णत: हा मदत करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT