Israeli airstrikes on Gaza Strip Twitter
ग्लोबल

Israeli Airstrikes: गाझा पट्टीत पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादींवर इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच

Israeli airstrikes on Gaza Strip: या हल्लात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असुन त्यात लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

इस्रायलने गाझा पट्टीवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले आहे. अजूनही त्यांचे हल्ले सातत्याने सुरूच आहे. इस्रायलच्या हल्ल्यात मृतांची संख्या वाढली आहे. पॅलेस्टाईन एन्क्लेव्हच्या आरोग्य मंत्रालयाने पॅलेस्टिनी चळवळ इस्लामिक जिहादच्या विरोधात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 24 लोक ठार आणि 203 जखमी झाल्याची माहिती दिली आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, "गाझा पट्टीमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे सहा मुले आणि महिलांसह 24 लोक ठार झाले आणि 203 लोक जखमी झाले." (Israeli airstrikes on Gaza Strip)

याआधी शुक्रवारी पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने पुढे सांगितले की, इस्रायलच्या संरक्षण दलाने गाझा पट्टीमध्ये इस्लामिक जिहाद चळवळीवर हवाई हल्ले करून ब्रेकिंग डॉन ऑपरेशन सुरू केले आहे. ज्यामुळे सुरुवातीला 10 लोक मारले गेले आणि 50 लोक जखमी झाले.

* पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद चळवळीच्या नेत्याने ही धमकी दिली

वृत्तानुसार, पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद चळवळीचा नेता झियाद नखालाह याने इस्रायलच्या हवाई हल्ल्याला तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ला करून प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. आणीबाणी लागू केल्यानंतर इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ले लांबणीवर टाकले होते. मात्र या काळात ते गाझा पट्टीवर सातत्याने नवनवीन हल्ले करत आहेत. इस्रायलने पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद चळवळीशी संबंधित लोकांना दहशतवादी म्हटले आहे. ताज्या माहितीनुसार, इस्रायली हवाई दल गाझा पट्टीतील इस्लामिक जिहाद आंदोलकांच्या बोगद्यांवर हवाई हल्ले करत आहे. यापूर्वीही इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये बराच तणाव निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT