Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायल हमासवर करणार जगातील पहिला एआय हल्ला? एकाच वेळी 100 ठिकाणे होणार उद्ध्वस्त

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 7 ऑक्टोबरपासून भयंकर युद्ध सुरु आहे. इस्त्रायली लष्कराच्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत 17 हजार 700 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, इस्रायली लष्कर गाझावर जगातील पहिला आर्टिफिशियल (AI) हल्ला करणार आहे. पहिल्यांदाच, इस्रायली सैन्य एआय हल्ल्याद्वारे एकाच वेळी 100 ठिकाणे नष्ट करेल. इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 7 ऑक्टोबरपासून भयंकर युद्ध सुरु आहे. इस्त्रायली लष्कराच्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत 17 हजार 700 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, इस्रायलने जगातील पहिला एआय आधारित हल्ल्याचा प्लॅन तयार करुन जगभरात खळबळ उडवून दिली आहे. जगातील पहिला एआय हल्ला किती प्राणघातक असेल या विचाराने जग चिंतेत आहे.

दरम्यान, आत्ताच गेल्या आठवड्यात इस्त्रायली लष्कर (आयडीएफ) गाझामध्ये हमास विरुद्ध सुरु असलेल्या युद्धात 'हबसोरा' नावाच्या एआय प्रणाली वापरत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. बॉम्बस्फोटांसाठी लक्ष्य निवडण्यासाठी, हमासच्या अतिरेक्यांचे लपलेले ठिकाण शोधण्यासाठी आणि संभाव्य मृतांच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. अशा एआय प्रणालींचा संघर्षात वापर करण्याचा काय अर्थ आहे? या प्रणालींच्या लष्करी वापराच्या सामाजिक, राजकीय आणि नैतिक परिणामांवरील संशोधन असे दर्शविते की, AI आधीच युद्धाचे स्वरुप बदलत आहे. सैन्य त्यांची ताकद वाढवण्यासाठी आणि त्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी या प्रणालींचा वापर करते. एआय प्रणाली सैनिकांना अधिक कार्यक्षम बनवू शकते आणि लढाईचा वेग आणि प्राणघातक हल्ले करण्याची क्षमता वाढवते.

एआय हे धोकादायक काम करु शकते

एआय प्रणाली युद्धाच्या काळात गैरसमज किंवा चुकीची माहिती देण्यास हातभार लावू शकते. या प्रणालीमुळे यंत्रांच्या सूचनांवर मानव जास्त विसंबून राहतो. हाबसोरा यंत्रणेतून ही बाब समोर आली आहे. एआय प्रणालीच्या मर्यादा कदाचित स्पष्ट नसतील. सर्वात मूलभूत आणि महत्त्वपूर्ण एआय बदलांपैकी एक म्हणजे युद्धाची तीव्रता वाढणे. एका माजी आयडीएफ प्रमुखाने सांगितले की, गाझामध्ये दरवर्षी 50 साइट्सला लक्ष्य केले जाऊ शकते, परंतु हबसोरा प्रणाली दिवसाला 100 लक्ष्ये तयार करु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT