Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Demolished Home: दंगलखोरांचा बिमोड करण्यासाठी इस्रायलमध्ये 'योगी फॉर्म्युला'

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीची चर्चा देशासह जगात होत आहे.

दैनिक गोमन्तक

Israel Army Demolished Home Of Suspected: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीची चर्चा देशासह जगात होत आहे. दंगलखोरांचा बिमोड करण्यासाठी इस्रायलने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना फॉलो केले आहे. ज्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांची हत्या केली त्यांचा बिमोड करण्यासाठी इस्रायली सैन्याने योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपध्दतीचा अवलंब केला. वेस्ट बँक सेटलमेंटमध्ये राहणाऱ्या दोन पॅलेस्टिनी संशयितांनी एका इस्रायली सुरक्षा रक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर इस्त्राइली सैन्यांनी ही कारवाई केली.

वेस्ट बँकमधील घरे पाडली

व्याचेस्लाव गोलेव नावाचा एक इस्रायली सुरक्षा रक्षक 29 एप्रिल रोजी वेस्ट बँकमध्ये झालेल्या गोळीबारात ठार झाला होता. त्यानंतर आता पॅलेस्टिनी दहशतवादी (Terrorist) संघटना हमासने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यातच इस्रायली लष्कराने हल्ला केल्याच्या संशयावरुन दोन पॅलेस्टिनींना अटक केली.

इस्रायली सैन्याने संशयितांची बेकायदेशीर घरे पाडली

इस्त्रायली सैन्याने सांगितले की, 'उत्तर पश्चिम किनारपट्टी भागात असलेल्या करावत बानी हसन गावात संशयितांना बेड्या ठोकल्या.' या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांवरही हल्ले करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. कारवाईदरम्यान इस्रायली सैनिकांवर पेट्रोल बॉम्ब आणि जळते टायरही फेकण्यात आले.

यूपीमध्ये बेकायदा मालमत्तेविरोधातील मोहीम तीव्र

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) योगी सरकारने बुलडोझर चालवून अनेक गुन्हेगारांची बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. या यादीत बड्या गुन्हेगारांपासून ते आमदारांचीही नावे आहेत. सीएम योगींनी केलेल्या कारवाईचा आदर्श डोळयासमोर ठेवत मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारने देखील अशाप्रकारची कारवाई केली. मध्य प्रदेश सरकारनेही योगी सरकारच्या कार्यशैलीचे पालन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: अजब तुझा कारभार! स्कूटीवर ठेवली दुसरी स्कूटी, तरुणीचा जीवघेणा जुगाड; सोशल मीडियावर अतरंगी व्हिडिओचा धुमाकूळ

Surya Gochar: सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश! 25 मे पासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; संपत्ती आणि सन्मानात होणार अफाट वाढ

Goa Crime: बेकायदेशीर पशुवाहतुकीवर पोलिसांचा घाला; वाळपईत तीन वासरे आणि बैलाची सुटका,संशयिताविरोधात गुन्हा दाखल

Khariwada Fish Market : ...तर आम्ही रस्त्यावर मासे विक्री करू! मासळी विक्रेत्यांचा इशारा : नगराध्यक्षांनी दिले कारवाईचे आश्वासन

जमिनी लाटण्याचं खापर केवळ देवस्थानांवरच का? पोर्तुगीज दडपशाहीच्या बाजूचा विसर पडला की काय?

SCROLL FOR NEXT