President Xi Jinping Dainik Gomantak
ग्लोबल

भारतात कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रसार करतोय चीन?

चीनचे (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे पुस्तकही हिंदी भाषेत प्रकाशित झाले आहे.

दैनिक गोमन्तक

चीन (China) भारताबरोबर सीमेवर लढत असताना आता विचारसरणीच्या (Communist Ideology) माध्यमातून भारतात हातपाय पसरण्याचा प्रयत्न करु लागला आहे. याच पाश्वभूमीवर आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे पुस्तकही हिंदी (Hindi) भाषेत प्रकाशित झाले आहे. चीनला आपली कम्युनिस्ट विचारसरणी भारतात (India) पसरवायची आहे, असे मानले जात आहे. मध्य आशियाई देशांतील इतर अनेक भाषांमध्येही हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक चीनमधील शासनासंबंधी शी यांच्या तत्त्वांवर प्रकाश टाकते. चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, 'शी जिनपिंग: द गव्हर्नन्स ऑफ चायना'' (Xi Jinping: The Governance of China) चा पहिला खंड हिंदी, पश्तो, दारी, सिंहली आणि उझबेक भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

एजन्सीनुसार, बुधवारी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) मध्ये एका समारंभात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे पुस्तक मंदारिन (Mandarin) व्यतिरिक्त इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये प्रकाशित होत आहे. 2012 मध्ये सत्तेवर आल्यापासून, 68 वर्षीय शी जिनपिंग हे माओ झेडोंगच्या (Mao Zedong) धर्तीवर एक प्रमुख नेते म्हणून उदयास आले आहेत. माओ हे सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) चे संस्थापक होते. शी यांनी नव्या युगात चिनी वैशिष्ट्यांसह समाजवाद नावाच्या नवीन वैचारिक भूमिकेचा पुरस्कार केला आहे.

शी यांची सत्तेवरील पकड मजबूत झाली

गेल्या आठवड्यात शी जिनपिंग यांची सत्तेवरील पकड मजबूत झाली आहे. त्यावेळी सीपीसीची बैठक आयोजित करण्यात आली होती. अशा स्थितीत पुढील वर्षी शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यकाळ सुरु करु शकतात, असे मानले जात आहे. न्यूझीलंडस्थित चिनी इतिहासकार जेरेमी आर. बर्मे म्हणतात की, सीपीसीची बैठक कम्युनिस्ट पक्ष आणि शी जिनपिंग (The Governance of China Book) यांच्या दीर्घकालीन सत्तेशी संबंधित आहे. भूतकाळात झालेला विकास लक्षात घेऊन भविष्यात पक्षाला त्यांच्यासाठी पाठिंबा वाढवायचा आहे. या बैठकीत ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला. जो इतिहासाच्या कामांशी कमी आणि भविष्यातील नेतृत्वाशी जास्त निगडीत आहे.

भ्रष्टाचार-गरिबीवर केले काम

गेल्या दशकात शी जिनपिंग हे चीनचे मोठे नेते म्हणून उदयास आले आहेत. त्यांनी देशातील भ्रष्टाचार निर्मूलन आणि गरिबी (Poverty in China) साठी उल्लेखनीय कार्य केले आहे. चीनची ताकद जगाला दाखवण्यासाठी शी जिनपिंग यांनाही देशात मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. असे असूनही, असे मानले जात आहे की पक्षात शी यांच्या विरोधात काम करणारे नेते त्यांना कोरोना महामारी (China Coronavirus Pandemic) आणि अमेरिकेशी बिघडलेले संबंध यासारख्या मुद्द्यांवर लक्ष्य करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT