Israel Iran Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Iran Attack: युद्धबंदीनंतर इस्त्रायलचा पुन्हा इराणवर हल्ला, अनेक ठिकाणी ऐकू आले स्फोटांचे आवाज, ट्रम्प यांनी व्यक्त केली नाराजी

Israel Airstrikes On Iran: इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष युद्धबंदीनंतरही शिगेला पोहोचला आहे.

Manish Jadhav

Israel Airstrikes On Iran: इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष युद्धबंदीनंतरही शिगेला पोहोचला आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आता इस्त्रायलने देखील आपली ताकद दाखवत इराणवर हवाई हल्ले केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशात मध्यस्थी करत युद्धबंदी घडवून आणली होती. मात्र दोन्ही देश सध्या ऐकाला तयार नाहीत. युद्धबंदीनंतर इस्त्रायलने अधिक आक्रमकरित्या हल्ले करण्यास सुरुवात केली.

इस्त्रायलचा पुन्हा इराणवर हल्ला

इराणी माध्यमांनुसार, मंगळवारी (24 जून) संध्याकाळी तेहरानच्या उत्तरेकडील भागात दोन मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्यांवरुन स्पष्ट होते की, मंगळवारी पहाटे ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतरही इस्रायलने इराणवरील (Iran) हल्ले थांबवलेले नाहीत. इस्रायलच्या या कृतीमुळे युद्धबंदीच्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो.

इस्रायलचा हल्ला पुन्हा युद्ध पेटवू शकतो

इस्रायल (Israel) आर्मी रेडिओने माहिती दिली की, इस्रायलच्या हवाई दलाने तेहरानजवळील एका रडारवर हल्ला केला. दुसरीकडे, अरब देशांनी दोन्ही देशांना युद्धबंदीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, तर ट्रम्प यांनीही इस्रायलच्या आक्रमक दृष्टिकोनावर खंत व्यक्त केली. इस्रायलचा हा हल्ला पुन्हा एकदा युद्ध पेटवू शकतो.

'मी इस्रायलवर खूश नाही'

दरम्यान, युद्धविराम सुरु होण्याच्या काही वेळ आधी इराण आणि इस्रायलने एकमेकांवर हल्ला केले. त्यानंतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. ट्रम्प म्हणाले की, "दोन्ही देशांनी युद्धबंदीच्या निर्णयाचे उल्लंघन केले. मी इस्रायलवर खूश नाही." ट्रम्प यांनी इस्रायलवर सडकून टीका केली.

इस्रायलच्या हल्ल्यांमुळे किती नुकसान झाले?

युद्धविरामानंतर झालेल्या या हल्ल्यात अद्याप कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही, परंतु इराण मीडियाने वृत्त दिले आहे की, इराणच्या शत्रूने तेहरानजवळील जुन्या रडारला लक्ष्य केले.

नेतन्याहू यांचे आवाहन

हल्ल्याच्या काही तास आधी अ‍ॅक्सिओसच्या एका पत्रकाराने एका एक्स पोस्टमध्ये एका इस्रायली अधिकाऱ्याचे म्हणणे उद्धृत केले होते की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोन करुन इराणवर हल्ला करु नये अशी विनंती केली. अ‍ॅक्सिओसच्या पत्रकाराने म्हटले की, नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना सांगितले की ते हल्ले रोखू शकत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT