Earthquake in Ladakh Dainik Gomantak
ग्लोबल

Iran Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले इराण , रिश्टर स्केलवर 5.9 तीव्रता

इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

दैनिक गोमन्तक

Iran Earthquake: इराण पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे.शनिवारी म्हणजेच २८ जानेवारी रोजी रात्री भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले. उत्तर-पश्चिम इराणमधील खोय शहरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. इराणच्या मीडियानुसार, भूकंपात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 440 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 इतकी मोजण्यात आली आहे. इराणमधील आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते मोजतबा खालेदी यांनी भूकंपातील मृत आणि जखमींची माहिती सरकारी दूरचित्रवाणीला दिली. 

  • भूकंपामुळे इराणची जमीन हादरली

इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या (Iran) पश्चिम अझरबैजान प्रांतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जोरदार होते. इराणच्या माध्यमांनी सांगितले की, वायव्य इराणच्या अझरबैजान प्रांतात शनिवारी तुर्कीच्या सीमेजवळ 5.9 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यात किमान 7 लोक ठार आणि 440 जखमी झाले. अनेक घरांचे अधिक नुकसान झाले आहे. रिपोर्टनुसार, इराणच्या इस्फहान शहरातील मिलिटरी प्लांटमध्येही मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. 

  • मदत आणि बचाव कार्य सुरू आहे

इराणच्या आपत्कालीन अधिकाऱ्यांनी सांगितले की, इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील भागात बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. भूकंपामुळे जखमी झालेल्या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपत्कालीन सेवेतील एका अधिकाऱ्याने राज्य टीव्हीला सांगितले की, काही प्रभावित भागात बर्फवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचीही माहिती आहे. 

  • भूकंपाचे कारण?

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग 7 टेक्टोनिक प्लेट्सचा बनलेला आहे, जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या दिशेने सरकतात तेव्हा त्यांची टक्कर होऊन भूकंप होतो. प्रमुख भूगर्भीय दोष रेषा इराणला ओलांडतात असे म्हटले जाते, ज्यामुळे देशाला अलिकडच्या वर्षांत अनेक विनाशकारी भूकंपांचा सामना करावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT