Transgender Ban Dainik Gomantak
ग्लोबल

Transgender Ban: ऑलिम्पिकमध्ये ट्रान्सजेंडर महिलांना बंदी? पॅरिस स्पर्धेतील वादानंतर IOC लवकरच घेणार मोठा निर्णय; लागू होणार नवा नियम

IOC Transgender Ban: पुढील वर्षापासून (2026) ऑलिम्पिकमधील महिलांच्या सर्व क्रिडा स्पर्धांमध्ये ट्रान्सजेंडर महिलांना खेळण्यास बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती घेणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.

Manish Jadhav

IOC Transgender Ban: पुढील वर्षापासून (2026) ऑलिम्पिकमधील महिलांच्या सर्व क्रिडा स्पर्धांमध्ये ट्रान्सजेंडर महिलांना खेळण्यास बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती घेणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झालेल्या काही स्पर्धांमुळे हा वाद सुरु झाला. विशेषतः बॉक्सिंगमध्ये अल्जेरियाच्या इमाने खेलीफ आणि चायनीज तैपेईच्या लिन यू-टिंग या ट्रान्सजेंडर महिला खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकल्यानंतर हा विषय खूपच गाजला.

पॅरिसमधील वाद आणि सध्याचे नियम

सध्या ऑलिम्पिकमध्ये असा नियम आहे की, प्रत्येक खेळाची आंतरराष्ट्रीय फेडरेशन ट्रान्सजेंडर (Transgender) महिलांना त्यांच्या खेळांमध्ये खेळू द्यायचे की नाही, हे ठरवते. यासाठी अशी अट आहे की, त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी एका ठराविक मर्यादेपेक्षा कमी असायला हवी. पण पॅरिस ऑलिम्पिकमधील काही निकालांमुळे अनेक खेळाडू आणि तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, ट्रान्सजेंडर महिलांना जैविक फायदा मिळत असल्याने महिलांच्या गटातील स्पर्धा निष्पक्ष राहत नाहीत, ज्यामुळे महिला खेळाडूंवर अन्याय होतो.

OC कडून पूर्ण बंदीची तयारी

या वादाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आता मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. आयओसीच्या नव्या अध्यक्ष किर्स्टी कोव्हेंट्री यांनी निवडणुकीपूर्वीच आश्वासन दिले होते की, त्या महिला खेळाडूंच्या हक्कांचे संरक्षण करतील. मिळालेल्या माहितीनुसार, आयओसी आता 2028 मधील लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपूर्वी सर्व खेळांवर ही सरसकट बंदी लागू करण्याची शक्यता आहे. म्हणजे, कोणत्याही खेळात ट्रान्सजेंडर महिलांना खेळता येणार नाही. हा निर्णय पुढील वर्षापासूनच लागू होईल, अशी शक्यता आहे. आयओसीचा हा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेशी जुळणारा आहे.

ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्येच एक आदेश जारी केला होता, ज्यानुसार ट्रान्सजेंडर महिलांना महिलांच्या स्पर्धांमध्ये खेळण्यापासून रोखण्यात आले होते. ट्रम्प यांनी हेही स्पष्ट केले होते की, 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी अमेरिकेत (America) येणाऱ्या कोणत्याही ट्रान्सजेंडर ॲथलीटला व्हिसा नाकारला जाईल. मात्र आता आयओसी ही बंदी जाहीर करण्याची शक्यता असल्यामुळे या विषयावर कोणताही मोठा वाद होण्याची शक्यता कमी झाली आहे. हा नियम लागू झाल्यास लॉरेल हबर्ड सारख्या खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये भाग घेता येणार नाही. लॉरेल हबर्डने 2012 मध्ये लिंग बदल केले आणि 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेतला. मात्र, आयओसीचा हा निर्णय लागू झाल्यास ऑलिम्पिक इतिहासात एक मोठा बदल ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

Sonam Wangchuk Hunger Strike: "मी भूत बनून परत येईन...", सोनम वांगचुक यांचा थेट इशारा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम

Sohail Khan: 'माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला, पण भीतीमुळे कुणालाही सांगितलं नाही'; सोहेल खानचा धक्कादायक खुलासा

Goa Monsoon: गोव्यात पावसाचं कमबॅक! सत्तरीतील रस्ते जलमय, मुसळधार सरींमुळे बळीराजा सुखावला

SCROLL FOR NEXT