International Yoga Day MALI  Dainik Gomantak
ग्लोबल

आंतरराष्ट्रीय योगा दिन: मालदिवमध्ये जमावाने योगा कार्यक्रम पाडला बंद

योग इस्लामविरोधी असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं

दैनिक गोमन्तक

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त भारतासह जगातील अनेक देशात योगा दिन मोठ्या उत्साहात पार पडाला. या पार्श्वभूमीवर भारतीय उच्चायुक्ताकडून मालदिवची राजधानी माले येथे ही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सुरु होण्याआधी आंदोलकांनी योगा इस्लामच्या विरोधात असलेले पोस्टर झळकावले. व योगा कार्यक्रम जमावाने बंद पाडला. (International Yoga Day: Crowds close yoga program in Maldives )

माले येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय युवा, क्रीडा आणि सामुदायिक सक्षमीकरण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सांस्कृतिक केंद्राने एका तासाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी जमावाने घुसखोरी करत गोंधळ घातला असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी आंदोलक हातामध्ये बॅनर घेऊन घोषणाबाजी केली. तसेच योग इस्लामविरोधी असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.

यावेळी आंदोलकांनी आयोजित कार्यक्रम तात्काळ बंद करावा आणि मैदान रिकाम करावं अशी मागणी केली. तसेच काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की. आपल्याला धमकावण्यात आले आहे. या कार्यक्रमास अनेक राजदूत, सरकारी अधिकारी आणि मालदीव सरकारचे मंत्री उपस्थित होते. यावेळीच आंदोलकांनी कार्यक्रमस्थळी तोडफोड देखील केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT