Covid Airport Dainik Gomantak
ग्लोबल

Covid-19: आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणे 28 फेब्रुवारीपर्यंत बंद; DGCAचा निर्णय

राज्यात दैनंदिन कोरोनारुग्णांची संख्या कमी - राजेश टोपे

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. जगात सध्या कोरोना रूग्णांची संख्या ही 328 कोटींच्या वर पोहेचली आहे. तसेच देशात करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,82,970 नवीन करोनाबाधितांसह 441 मृत्यूंची नोंद करण्यात आली. देशात सध्या 18 लाख 31 हजार सक्रीय रुग्ण असून पॉझिटिव्हीटी रेट 15.13 टक्के आहे. तर गेल्या 24 तासांत ओमायक्रॉन (Omicron) बाधितांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तर आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ओमायक्रॉनचे 8 हजार 961 रुग्ण आढळले आहेत.(Covid Update)

याच दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी बुधवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाण वगळता आंतरराष्ट्रीय (International) व्यावसायिक प्रवासी उड्डाणे ही 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. मात्र ज्यांना DGCA ने मंजूरी दिली आहे. ज्या देशांसोबत भारताने एअर बबल व्यवस्था केली आहे त्याच देशांतील उड्डाणे, सुरू राहतील. यापूर्वी, डीजीसीएने 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मागे घेत 31 जानेवारी 2022 पर्यंत बंदी वाढवली होती.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट- आरोग्यमंत्री टोपे

एएनआयशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी सांगितलं की, राज्यात दैनंदिन कोरोनारुग्णांची संख्या आता कमी होत आहे. सध्या राज्यातली परिस्थिती नियंत्रणात आहे. खूप कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत आहे. चाचण्यांच्या संख्येत वाढ करणं आणि जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण व्हावं यासाठी सरकार पूर्ण क्षमतेनं काम करत आहे असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT