Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका; इम्रान खान यांनी सरकारला घेरले

पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेल 30 रुपयांनी महागलं

दैनिक गोमन्तक

आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांनी अनेकदा चर्चेच येणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानमधील राजकीय आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर शाहबाज शरीफ सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच भारताने इंधनाच्या किंमती केल्या असल्याने भारताने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक देखील केले आहे. (Inflation erupts in Pakistan )

पाकिस्तानमधील पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती 30 रुपयांनी वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये जनतेला यापूढे पेट्रोलसाठी 179.86 रुपये आणि डिझेलसाठी 174.15 रुपये प्रति लिटर मोजावे लागणार आहेत. याचा परिणाम सर्व नागरिकांना इंधन वाढीने दैनंदिन गरजेच्या वस्तु यापूढे चढ्या किंमतीने खरेदी कराव्या लागणार आहे. या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शाहबाज शरीफ सरकारला घेरले आहे. त्यांनी पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारला असंवेदनशील म्हटलं आहे.

इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक करत म्हटले आहे की, अमेरिकेच्या मित्र राष्ट्राने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून इंधनाचे दर प्रतिलिटर 25 रुपयांनी कमी केले.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 रुपयांची वाढ करून देशातील जनता आयात केलेल्या सरकारला विदेशी मालकांच्या अधीन करण्याची किंमत मोजत आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शाहबाज शरीफ सरकारवर टीका करताना म्हटले आहे कि, या असंवेदनशील सरकारने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने रशियासोबत 30 टक्के स्वस्त तेलासाठी केलेला करार पुढे नेला नाही, आमच्या कराराचा पाठपुरावा केला नाही. ही एकाच वेळी झालेली सर्वात मोठी वाढ आहे. अक्षम आणि असंवेदनशील सरकारने रशियाशी आमच्या कराराचा पाठपुरावा केला नाही. पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषदेत किमतींबाबत घोषणा केली, जिथे ते म्हणाले की, सरकारकडे किंमती वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्हाला टीकेला सामोरे जावे लागेल, पण देशाचे हित आमच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि ते वाचवणे आमच्यासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT